Sharad Pawar sakal media
पुणे

विरोधामुळे वाईनचा निर्णय बदलल्यास वाईट वाटण्याचं कारण नाही - शरद पवार

सकाळ डिजिटल टीम

वाईन आणि इतर जे काही आहे त्यात फरक जाणून घेण्याची भूमिका घेतली पाहिजे असंही शरद पवार म्हणाले.

बारामती - सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिल्यानंतर राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात विरोधकांनी टीका केली आहे. भाजपने विरोध करताना राज्याला मद्यराष्ट्र करण्याचा घाट सरकारने घातला असल्याचा आरोप केला होता. आता वाईन विक्रीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटलं की, वाईन विक्रीच्या निर्णयाला विरोध होत असल्यानं निर्णय बदलल्यास वाईट वाटण्याचं काही कारण नाही.

गोविंदबाग या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. राज्य सरकारच्या सुपर मार्केट मधील वाईन उपलब्ध करून देण्याच्या निर्णयावर भाजपसह काही संघटनांनी विरोध केला आहे या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले,'वाईन आणि इतर जे काही आहे त्यात फरक जाणून घेण्याची भूमिका घेतली पाहिजे. ती भूमिका घेतली नाही आणि त्याला विरोध असेल तर सरकारने या सगळ्या गोष्टीसंदर्भात वेगळा विचार केल्यास माझा त्याला विरोध असण्याचं कारण नाही.' राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाईन आणि दारुमध्ये जमीन आस्मानचा फरक असल्याचं म्हटलं होतं.

राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या परवानगीबाबतच्या निर्णयाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर राज्याने तो बदलल्यास त्यात वाईट वाटण्यासारखं काही नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं की, 'हा फार चिंताजनक विषय असल्याचं मला वाटत नाही. तरी काही घटकांना वाटत असेल तर राज्य सरकारने काही वेगळा दृष्टीकोन स्वीकारला तर त्याच्यात फारसं वावगं ठरणार नाही.'

देशभरातील सर्वच राज्यांमध्ये दुकानांमध्ये देशी आणि विदेशी दारू मिळते. त्यामध्ये वाईन चा खप अत्यंत तुलनेने कमी आहे. देशातील सर्वाधिक द्राक्ष उत्पादन हे नाशिक जिल्ह्यात होते. या जिल्ह्यामध्ये अठरा वाईनरी आहेत. 18 वायनरी उत्पादन घेतात. ही वाईन केवळ मोठ्या मॉल्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सरकारने मंजुरी दिली आहे. वायनरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळते. मात्र त्याला विरोध होत असेल तर सरकारने या संदर्भात काही वेळा निर्णय घेतला, तो निर्णय मागे घेतला तरी त्याचे काही वाईट वाटायचे कारण नाही असंही शरद पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT