Sharad Pawar: Esakal
पुणे

Sharad Pawar: गोविंदबागेतल्या दिवाळीसाठी अजित पवार अनुपस्थित, शरद पवारांचं स्पष्टीकरण म्हणाले, 'कोणी...'

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यापासूनच शरद पवार आणि अजित पवार हे दिवाळीसाठी एकत्र येणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता.

अंकिता खाणे (Ankita Khane)

आज दिवाळी पाडव्यानिमीत्त बारामतीतल्या गोविंदबाग येथे शरद पवारांना भेटण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते, नेते, लोक आले होते. दिवाळीच्या पाडव्याच्या निमित्ताने बारामतीतल्या गोविंदबाग या ठिकाणी पवार कुटुंब दरवर्षी एकत्र येतात. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यापासूनच शरद पवार आणि अजित पवार हे दिवाळीसाठी एकत्र येणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता.

शनिवारी शरद पवार आणि अजित पवार हे दिवाळीनिमित्त प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी एकमेकांना भेटले होते. अशातच आज गोविंदबाग या शरद पवारांच्या बारामतीतल्या निवासस्थानी शरद पवार आणि इतर पवार कुटुंबीय जमलेत मात्र, रोहित पवार आणि अजित पवार आले नाहीत. यामागचं कारण पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी सांगितलं आहे.

काय म्हणाले शरद पवार?

काही कामानिमीत्त रोहित पवार बाहेर गेले आहेत. त्यांचा दौरा सुरू आहे. रोहित पवारांची संघर्ष यात्रा आहे, त्याचबरोबर प्रत्येकाचे काही प्रश्न आहेत, कोणाचा आजार आहे. यामुळे ते हजर नाहीत. यामुळे समज-गैरसमज करण्याचे कारण नाही, असंही पुढे शरद पवार म्हणाले आहेत.

प्रत्येकाची काही ना काही कारणं आहेत, कोणाची वैयक्तीक आहेत, कोणाचं आजारपणाचं कारण आहे, कोणी दौऱ्यावर आहेत, त्यामुळे आज सगळे गोविंदबागेत उपस्थित राहिले नाहीत, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! सलग तिसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा ताजा भाव

T20 WC: वानखेडे स्टेडियमवर शांतता ठेवू... भारताविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी इंग्लंडच्या स्टार खेळाडूची वॉर्निंग

'बिग बॉसमध्ये गेल्यामुळे मेंदूला किडे लागले...' उषा नाडकर्णी म्हणाल्या...'मला त्यावेळी खूप त्रास...'

Latest Marathi News Live Update : दुबईत अडकलेल्या पुणेकरांची माहिती राज्य सरकारकडून संकलित

Sangli Agents Stuck : इस्रायल–इराण संघर्षाच्या छायेत सांगलीतील १० विमा प्रतिनिधी दुबईत अडकले; एअर इंडियाचे उड्डाण रद्द

SCROLL FOR NEXT