सातारा आत
................
पक्षांतराच्या कारणाबाबत
शेखर गोरेंचे ‘वेट ॲण्ड वॉच’
मुख्यमंत्र्यांवर आरोप, तर शिंदेंना साथ
सातारा, ता. २९ : विधानसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला शब्द दिला होता. तो शब्द त्यांनी पाळलेला नाही. त्यामुळे मी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे स्पष्ट करून जिल्हा बॅंकेचे संचालक, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांनी प्रवेशाची तारीख अजून ठरलेली नसल्याचेही सांगितले.
दरम्यान, हा प्रवेश मुंबईतच होईल असे सांगताना त्यांनी अचानक असा निर्णय घेण्यामागचे कारण मात्र गुलदस्त्यात ठेवत ‘वेट ॲण्ड वॉच’, ‘नो कमेंटस्’ असे म्हणत अधिक बोलणे टाळले.
जिल्हा बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी ते आज बॅंकेत आले होते. त्यावेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. गोरे म्हणाले, ‘‘गेल्या विधानसभेवेळी मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला होता. मात्र, तो शब्द पाळलेला नाही. त्यानंतर घडलेल्या घटना लक्षात घेता मी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे.’’ तुमच्या या निर्णयामुळे अनेक राजकीय समीकरणे बदलणार आहेत, अचानक निर्णयाचे नेमके कारण काय, यावर त्यांनी वेट ॲण्ड वॉच आणि नो कमेंटस् असे सांगितले. प्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे; परंतु प्रवेशाची तारीख अजून ठरलेली नाही. ती लवकरच जाहीर करू, असेही ते म्हणाले.
.................................
सदस्यही शिवसेनेत येणार
तुमची नाराजी नेमकी कोणावर आहे, या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘ते सर्वांना माहिती आहे. थोड्या दिवसांनी आणखी बरीच माहिती मी देणार आहे. प्रवेशाचा कार्यक्रम मुंबईत झाल्यावर माण तालुक्यातही कार्यक्रम होईल.’’ माझ्यासोबत माझे सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यही शिवसेनेत येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
..............................
फोटो :.......... शेखर गोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.