शिरूर, ता. २० : तालुक्यातील मलठण येथील एमडी जप्तीच्या कारवाईनंतर आता शिरूर शहरातही अमली पदार्थ विक्रीचे जाळे सक्रिय असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी येथील एका लॉजवर छापा टाकून एमडी विक्रीच्या तयारीत असलेल्या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून वीस ग्रॅम एमडीसह नऊ लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दादा बबन धावडे आणि अमोल राजाराम पोटावळे (दोघेही रा. राजापूर, ता. श्रीगोंदे, जि. अहिल्यानगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मार्वल कम्फर्ट लॉजवर रात्री उशिरा छापा टाकला असता, एका खोलीत वास्तव्यास असलेल्या धावडे व पोटावळे यांच्याकडे चार लाख रुपये किमतीचे वीस ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन मोबाइल दूरध्वनी आणि एक आलिशान मोटार (एमएच-१६ बीएम ७९९९) असा मुद्देमाल जप्त केला.
काही काळापूर्वी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शिरूर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे तालुक्यातील एमडी विक्रीला आळा बसला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी मलठणमध्ये झालेल्या मोठ्या कारवाईपाठोपाठ आता शहरातही दोघे सापडल्याने अमली पदार्थ विक्रेत्यांचे जाळे पुन्हा सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचून संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हवालदार संजीव जाधव यांनी फिर्याद दिली असून, शिरूर पोलिस ठाण्यात ‘एनडीपीएस’ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक विनोद पाटील करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.