पुणे

शिक्रापुरात हजारो लिटर पाण्याचा अपव्यय

CD

शिक्रापूर, ता. १२ : भर उन्हाळ्यात पाणीटंचाई टिपेला पोचलेली असताना शिक्रापूर पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यातून पाण्याची गळती होत आहे. ती त्वरित थांबविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. याबाबत ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे यांनी तत्काळ कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील नागरिकांना दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाण्याच्या समस्येला सामोरे जावेच लागते. त्याचे कारण जलस्रोत आटणे, चासकमान कालव्याचे पाणी आवर्तन वेळेवर न होणे असे असते. सध्याच्या पाणीपुरवठा योजनेत कोंढापुरी येथील तलावातून पाणी आणून गावात पुरवठा केला जातो. अशातच कासारी फाटा परिसरात या योजनेची जलवाहिनी फुटल्याने दररोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष घालून जलवाहिनीची दुरुस्ती करावी व होणारा पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, येथील पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळाली आहे. ग्रामपंचायतीमार्फत पाहणी करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला पत्र देण्यात येणार असून संबंधित दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात येईल.
05378

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Action On Banks: आरबीआयने मुंबईतील ५२ वर्षे जुन्या बँकेचा परवाना केला रद्द ; तुमचंही खातं आहे? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

Pune News : पंतप्रधानांच्या आवाहनानंतरही अधिकाऱ्‍यांचा परदेश दौरा

Pune Businessman Death : पुणे हादरलं! प्रसिद्ध उद्योजकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू; आर्थिक विवंचनेतून टोकाचं पाऊल? मृतदेहाजवळ सापडली चिठ्ठी

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

GT vs SRH Live : साई सुदर्शनने इतिहास रचला! गुजरातचा डोलारा सांभाळला; हैदराबादविरुद्ध विक्रमी खेळी अन् आव्हानात्मक लक्ष्य

SCROLL FOR NEXT