शिवनेरी संग्रहालय आणि बालसंस्कार सृष्टीची शिवजयंतीला होणार घोषणा Sakal
पुणे

Shiv Jayanti 2024 : शिवनेरी संग्रहालय आणि बालसंस्कार सृष्टीची शिवजयंतीला होणार घोषणा; अजित पवारांनी बोलावली तातडीची बैठक

छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरील अंबरखाना संग्रहालय आणि बालसंस्कारसृष्टीची घोषणा शिवजयंतीला किल्ल्यावर होण्याची दाट शक्यता आहे.

गणेश कोरे - सकाळ वृत्तसेवा

Pune News- छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरील अंबरखाना संग्रहालय आणि बालसंस्कारसृष्टीची घोषणा शिवजयंतीला किल्ल्यावर होण्याची दाट शक्यता आहे.

याबाबत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता.12) मंत्रालयात तातडीची बैठक बोलविली आहे. याबाबत खासदार डाॅ. अमोल कोल्हे आणि आमदार अतुल बेनके यांनी मंत्री पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

तर मागील अर्थसंकल्पात शिवनेरीसह 6 किल्ल्यांवर शिवसृष्टी उभारण्याची घोषणा तत्कालीन अर्थमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तर मागील शिवजयंतीला तत्कालीन पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जुन्नर येथे शिवबालसंस्कार सृष्टीची घोषणा केली होती.

जुन्नरच्या सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेच्यावतीने अंबरखाना इमारत संग्रहालयासाठी पाठपुरावा सुरू होता. जुन्नर तालुक्याला इ. स. पूर्व इतिहास असून, त्याची माहिती पर्यटकांना मिळत नाही. यामुळे किल्ल्यावरील अंबरखाना इमारतीमध्ये कायमस्वरूपी माहिती केंद्र आणि शिवकालीन शस्त्रास्त्र संग्रहालय उभारण्यात यावे, अशी मागणी सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने 19 फेब्रुवारी 2007 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे केली होती.

तर खासदार अमोल कोल्हे यांनी शिवसंस्कार सृष्टीची मागणी केली होती. याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल देखील तयार असून, यावर उद्याच्या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन, शिवजयंतीला घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT