प्रधान मास्तर sakal
पुणे

प्रधान मास्तरांचे पुण्यात स्मारक व्हावे

ग. प्र. प्रधान जन्मशताब्दी निमित्त कार्यक्रमात सूर

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘आजच्या राजकारणामुळे कलुषित झालेल्या समाज जीवनात प्रधान सरांचे जीवन दीपस्तंभाप्रमाणे आहे. त्यांच्यासारखा तत्वनिष्ठ आणि हाडाचा शिक्षक आता होणे नाही. त्यामुळे त्यांचे स्मारक पुण्यात व्हावे,’ असा सूर ग. प्र. प्रधान जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या परिसंवादात गुरुवारी उमटला.

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, साधना साप्ताहिक, साहित्य शिवार दिवाळी अंक आणि अक्षरधारा बुक गॅलरी यांच्यातर्फे 'प्रा. ग. प्र. प्रधान यांची विचारसृष्टी आणि समकालीन राजकारण' या विषयावर परिसंवाद झाला. यावेळी “पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. या विद्यानगरीत प्रधान मास्तरांचे स्मारक झाल्यास ते पुढच्या पिढ्यांतील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी प्रेरक ठरेल”, असे मत सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी व्यक्त केले.

‘म.सा.प.’चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी वैयक्तिक आशा आकांक्षांच्या पलीकडे जाऊन समाजहिताचे तत्वनिष्ठ राजकारण कसे करता येते, याचा आदर्श प्रधान सरांनी घालून दिला, असे मत व्यक्त केले. तर “प्रधान सरांची भाषणे आजच्या लोक प्रतिनिधींनी अभ्यासली पाहिजे. त्यांची विचारसृष्टी चौफेर वाचनातून घडली होती”, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले यांनी केले. प्रधान यांच्या शिक्षकी पेशाची बाजू उलगडून सांगताना ज्येष्ठ संपादक एस. के. कुलकर्णी म्हणाले, “प्रधान मास्तर विद्यार्थ्यांवर प्रेम करत. ते समाज शिक्षक होते. सर्वत्र शिक्षक म्हणूनच ते वावरले. त्यांच्यासारखा शिक्षक आता होणे नाही.”

“प्रधान सरांनी स्वत:च्या मर्यादांविषयी स्वत:च प्रांजळपणे लिहून ठेवले. त्यामुळे त्यांच्यावर कधीही टीका झाली नाही. त्यांचे अप्रकाशित साहित्य या वर्षात प्रकाशित केले जाईल”, असे यावेळी साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी सांगितले.

यावेळी प्रधान यांच्या 'स्वातंत्र्य संग्रामाचे महाभारत' आणि 'माझी वाटचाल' या पुस्तकांच्या अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन झाले. कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका जयराम देसाई यांनी प्रास्ताविकात सांगितली. प्रकाश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले. ‘अक्षरधारा’च्या रसिका राठीवडेकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT