accident.jpg
accident.jpg 
पुणे

आजी तुझ्या हातचं जेवायचंय म्हणून केलेला तो फोन ठरला शेवटचा

अशोक गव्हाणे

कात्रज (पुणे) : आजी तुझ्या हातचं जेवायचंच म्हणून शुभमने केलेला तो फोन शेवटचा ठरला. आजचा दिवस सुपेकर कुटुंबियासांठी काळा दिवस ठरला. मुंबई-बंगळुरु महामार्गावरील नवले पुलाजवळ मंगळवारी सकाळी ११ वाजता भीषण अपघात झाला. ब्रेक निकामी झालेल्या ट्रकने ७ दुचाकी व ८ चारचाकी वाहनांना अक्षरश: चिरडले. त्यामध्ये शुभम प्रकाश सुपेकर (वय २४) रा. ग्रीन व्हॅली सोसायटी याचा जागीच मृत्यू झाला. शुभमने सकाळी आपल्या आजीला फोन केला होता. फोन करुन शुभमने आजीला कारल्याची भाजी आणि भाकरी करुन ठेवण्याचे सांगून मी दुपारी जेवायला येणार असल्याचे सांगितले होते, पण हा अपघात झाल्याने त्याने आजीकडे भाकरी आणि कारल्याची भाजी खाण्याची इच्छा व्यक्त केलेली तशीच राहून गेली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दैनंदिन कामकाजासाठी शुभम हा घराबाहेर पडला होता. त्याच्या वडिलांकडे बिसलेरी कंपनीची डिलरशीप आहे त्या कामात तो वडिलांना मदत करायचा. दररोज सकाळी वितरणासाठी निघणाऱ्यां गाड्यांसाठी तो वडिलांना मदत म्हणून सकाळी डिझेल भरण्यासाठी जात असे. आजही त्याने घटनास्थळाच्या विरुद्ध बाजूला असणाऱ्या पंपावर सर्व गाड्यांना डिझेल भरून दिले आणि परतत असताना हा अपघात घडला. 

सुपेकर कुटुंबियांना शुभमच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे. शुभमचे वय २४ वर्ष असले तरी एक प्रकारे तो घरातील कर्ता पुरुष असल्याचे त्याचे वडील सांगतात. शुभमचे वय सहा वर्षे असताना त्याच्या आईचे निधन झाले होते. त्यानंतर घरात शुभमचे वडील आणि बहिण असे तिघेच होते. शुभमची बहिण लहान असून आता ती दहावीला आहे. शुभमची आई गेल्याची सल मनात असतानाच शुभमच्या जाण्याने कधीही न भरुन निघणारे नुकसान सुपेकर कुटुंबियांचे झाले आहे. शुभम वडिलांच्या व्यवसायात पूर्णपणे मदत करत असे त्यामुळे त्याच्या जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. भरधाव ट्रकने रस्त्यावरुन जाणाऱ्या ७ ते ८ दुचाकींना उडविले, तरीही ट्रक थांबला नाही, त्यापुढेही वेगात जाणाऱ्या ट्रकने ८ ते ९ चारचाकी वाहनांना उडविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2024: केएल राहुलला डच्चू, तर हार्दिक उपकर्णधार; वर्ल्ड कपसाठी कसं भारतीय संघात कसं आहे खेळाडूंचं संमिश्रण

Latest Marathi News Live Update : मनीष सिसोदियांना झटका! कोर्टानं दुसऱ्यांदा नाकारला नियमित जामीन

Dombivli News : डोंबिवलीत महाविकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन; उमेदवार वैशाली दरेकर यांनी भरला उमेदवारी अर्ज

Kiran Mane: उज्ज्वल निकम अन् एस.एम. मुश्रीफांच्या पुस्तकातले सिक्रेट्स; मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत किरण मानेंनी शेअर केली पोस्ट

Rajan Patil : मोहोळ तालुक्याचा दुष्काळ हटविण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला ज्यादा मताधिक्य देण्याचा निर्धार - राजन पाटील

SCROLL FOR NEXT