पुणे

बहिणीच्या विवाहासाठी काढले कर्ज

CD

बहिणीच्या विवाहासाठी काढले कर्ज;
लिंकवर क्लिक, खाते रिकामे

तरुणाची जेलरोड पोलिसांत धाव; पोलिस निरीक्षकांकडे तपास
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २२ : बहिणीचा विवाह काही दिवसांवर आल्याने तरुणाने बॅंकेतून तीन लाख रुपयांचे कर्ज काढले होते. १९ ऑक्टोबरला त्याने एका अनोळखी लिंकवर क्लिक केले आणि त्या तरुणाचे बॅंक खाते रिकामे झाले. आता त्या तरुणाने जेलरोड पोलिसांत धाव घेतली आहे. योगेश अंबाजी कांबळे (वय ३५, रा. व्यंकटेश्वर नगर, दाजी पेठ, सोलापूर) असे फिर्यादीचे नाव आहे.
फिर्यादी योगेश कांबळे हा घरी असताना १९ ऑक्टोबरला त्याच्या मोबाईलवर अनोळखी लिंक आली. कर्जासंबंधीची ती लिंक होती आणि त्यावर त्याने क्लिक केले. काही वेळातच त्याच्या बॅंक खात्यातून दोन लाख ९३ हजार ९६५ रुपये लंपास झाले. त्याला बॅंक खात्यातून पैसे कट झाल्याचे मेसेज आले. त्याने स्वत:च्या ‘फोन पे’वरून बॅंक बॅलन्स तपासला. त्यावेळी त्याच्या बॅंक खात्यात अवघे काही रूपये शिल्लक राहिले होते. बुधवारी (ता. २१) त्याने पोलिस ठाणे गाठले आणि बॅंक खात्यातून पैसे लंपास झाल्याची फिर्याद दिली. पोलिसांनी नेमके काय झाले, अशी विचारणा केली. मात्र, मला काहीच माहिती नाही, अचानक पैसे कट झाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पण, अनोळखी लिंकवर क्लिक केल्यानेच पैसे लंपास झाल्याचा संशय पोलिसांना आहे. समोरील कोणाच्यातरी क्रेडिट कार्डचे बिल भरले गेल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. पोलिस त्याच्या मोबाईलसंदर्भातील माहिती घेत आहेत. पोलिस निरीक्षक जयदिप कळेकर तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MBBSच्या विद्यार्थ्यांना दिलासा! अतिरिक्त परीक्षेची संधी; महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा मोठा निर्णय

SANJU SAMSON RECORD: जगात भारी संजू सॅमसनचा विक्रम! जोस बटलरला मागे टाकत २००+ स्ट्राइक रेटने नवा विक्रम;T20 क्रिकेटमध्ये बनला नंबर वन!

Latest Marathi News Live Update : पहिल्या टी-२० सामन्यात भारताकडून न्यूझीलंड गारद

करण जोहरला हवा आहे आयुष्याचा जोडीदार! म्हणाला, ‘लग्न कदाचित शक्य नाही, पण…’

Thane Water Supply: ठाणे जिल्ह्यात जलसंकटाचे सावट! तब्बल 36 तास पाणीपुरवठा बंद, कोणत्या भागात कधी पाणीबाणी?

SCROLL FOR NEXT