Pune PMC  sakal
पुणे

जायकाच्या कामासाठी सहा कंपन्यांनी भरली निविदा

सहा कंपन्यांनी या प्रकल्पाचे काम करण्याची तयारी दर्शविली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील मैलापाण्यावर शुद्धीकरण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘जायका’ प्रकल्पासाठी निविदा भरण्याची मुदत संपल्यानंतर आता ‘अ’ पाकिट उघडण्यात आले असून, यामध्ये सहा कंपन्यांनी या प्रकल्पाचे काम करण्याची तयारी दर्शविली आहे. या कंपन्यांच्या कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर सर्वात कमी रक्कम कोणत्या कंपनीने प्रस्तावित केली आहे हे स्पष्ट होणार आहे. (Pune News)

मुळा-मुठा नदीत येणारे मैलापाणी शुद्ध करण्यासाठी जपान येथील ‘जायका’ कंपनीच्या मदतीने हा प्रकल्प केला जाणार आहे. २०१५ ला प्रकल्प मंजूर करण्यात आला. यासाठी महापालिकेतील अधिकाऱ्यांनी ‘जायका’ने निश्‍चीत केलेल्या नियम, अटींमध्ये बदल करून निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यास आक्षेप घेण्यात आल्याने ती प्रक्रिया रद्द करून पुन्हा नव्याने निविदा मागविण्यात आल्या. या गोंधळात या प्रकल्पाला सहा वर्ष उशीर झाला झाल्याने तो अद्यापही कागदावरच आहे. या काळात प्रकल्पाचा खर्च वाढला असून, ९९५ कोटी वरून १५११ कोटी इतका खर्च झाला आहे त्यामुळे महापालिकेवर सुमारे ७०० कोटीचा भार निर्माण झाला आहे.

महापालिकेने दुसऱ्यांना निविदा मागविल्या असताना त्यात एक हजारापेक्षा जास्त तांत्रिक चुका होत्या. त्या दुरुस्त करण्याची सूचना ‘जायका’ सह ठेकेदारांनी केल्या होत्या. दरम्यान, निविदा भरण्याची शेवटची तारीख १७ आॅगस्ट होती, पण युरोपात कोरोनाची साथ वाढल्याने कंपन्यांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार ‘जायका’ने एका आठवड्याची मुदत वाढवून दिली. ही मुदत आज संपली असता यात ६ कंपन्यांनी निविदा भरल्याचे स्पष्ट झाले आहे.

या सहा कंपन्यांचे ‘अ’ पाकिट उघडण्यात आले आहे. त्यामध्ये कंपनीच्या कागदपत्रांची छाननी केली जाते, त्यात ती पात्र ठरल्यास त्यानंतर प्रकल्पाच्या कामासाठी निविदेत भरलेली रक्कम बाहेर येईल. महापालिकेची समिती व जायका कंपनीकडून छाननी होण्यास किमान एका महिन्याचा कालावधी लागेल, असे मलनिःसारण विभागाचे अधिक्षक अभियंता जगदीश खानोरे यांनी सांगितले.

या आहेत सहा कंपन्या

  1. १ मे. टाटा प्रोजेक्ट्स प्रा. लि व पी अँड सी प्रोजेक्ट्स-कन्सोरशिअम

  2. २ मे. एनव्हायरो कंट्रोल व तोशिबा वॉटर सोल्यूशन्स-जेव्ही

  3. ३ मे. व्हीए टेक वाबाग व पी. सी.आय.एल-जेव्ही

  4. ४ मे. एल अँड टी व के.आय.पीएल-जेव्ही

  5. ५ मे. जे.एम.सी व मेटीटोव अल्के -जेव्ही

  6. ६ मे. जे. डब्ल्यू.आय. एल व एस.एस.जी व एस. पी.एम.एल- जेव्ही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arabian Sea Cyclonic Winds : अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांमुळे पावसाची शक्यता; पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

Sugar Stock Limits: साखरेच्या साठवणुकीवर केंद्राचे निर्बंध; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर निर्णय; पंधरा दिवसच साठा ठेवता येणार

Shivneri Kabaddi Tournament: अमर हिंदच्या विजयात सेजल कांबळे चमकली; जय भारत, यश, विश्वशांतीसह मुंबई पोस्टलचीही आगेकूच

आजचे राशिभविष्य - 16 ऑक्टोबर 2026

Navratri Upvas Recipe: बटाटा-खोबऱ्याचे चटपटीत कॉम्बिनेशन! नवरात्रीच्या उपवासाला बनवा खमंग, कुरकुरीत फराळी पॅटिस...

SCROLL FOR NEXT