Pune  sakal
पुणे

Pune : महसूलीतील तूटीमुळे कोंढव्यातील स्लॉटर हाऊस बंद करावेच लागेल - पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन

महापालिकेच्या स्लॉटर हाऊसकडून २५० रुपये आकारण्यात येतात

- मोहिनी मोहिते --------

पुणे कॅन्टोन्मेंट : कोंढवा येथील कत्तलखाना (स्लॉटर हाऊस) च्या माध्यमातून, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला अत्यल्प महसूल मिळतो. मात्र स्लॉटर हाऊस च्या मेन्टेनन्सचा खर्च कोट्यावधी रुपयो येतो. त्यामुळे बोर्डाला कोंढव्यातील स्लॉटर हाऊस चालविणे शक्य नाही.

त्यामुळे आगमी काळात हे स्लॉटर हाऊस बंद करावेच लागेल.अशी माहिती पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ सुब्रत पाल यांनी दिली. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने कोंढव्यातील स्लॉटर हाऊस बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या विरोधात व्यावसायिकांनी दहा जुलै रोजी धरणे आंदोलन केले होते.

त्यावेळी आमदार सुनील कांबळे यांनी बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन,व्यावसायिकांना दहा दिवसांची सवलत देण्याची मागणी केली होती. त्यानुसार सध्यातरी बोर्ड प्रशासनाने स्लॉटर हाऊस येथील व्यावसायिकांना काही दिवसांसाठीची सवलत दिली आहे.

कोंढवा येथील कत्तलखाना ब्रिटीशकालिन आहे.आर्थिक कारणास्तव बोर्ड प्रशासनाने कत्तलखाना बंद कऱण्याचा निर्णय घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.ऑल इंडिया जमैतुल कुरेश एक्शन कमिटीच्या सदस्यही धरणे आंदोलन देखील केले होते.

पाल यांनी सांगितले की, कोंढवा येथील स्लॉटर हाऊसचा वार्षिक देखभालीचा खर्च १ कोटी २५ लाख रुपये येतो. हा संपूर्ण खर्च बोर्ड प्रशासनाला करावा लागतो. मात्र,तेथील व्यावसायिकांकडून भाडेस्वरूपात बोर्डाला वर्षाला फक्त पाच लाख रुपये महसूल मिळतो. तेथील व्यावसायिकांकडून एका बकऱ्यासाठी केवळ १६ रुपये आकारण्यात येतात.

मात्र, महापालिकेच्या स्लॉटर हाऊसकडून २५० रुपये आकारण्यात येतात. बोर्डाला कोंढव्यातील स्लॉटर हाऊसमार्फत महसूल मिळत नाही. त्यामुळे बोर्डाचेच आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळेच भविष्यात स्लॉटर बंदच करावे लागेल. असेही बोर्ड प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT