पुणे

सिमेंटच्या जंगलात वाढला मलबेरी रानमेव्याचा गोडवा

CD

पौड, ता. १३ : वेगाने शहरीकरण होत असलेल्या भूगाव माताळवाडीत (ता. मुळशी) सिमेंटचे जंगल वाढले आहे. मात्र याच जंगलात माजी सरपंच मधुकर पोपट गावडे काळ्या आईशी इमान राखत शेतीत नवनवे प्रयोग करतात. त्यांनी नैसर्गिक पद्धतीने सहा वर्षांपासून बांधावर मलबेरी रानमेव्याची लावली. त्यातून योग्य निगा राखत, एक रुपयाही खर्च न करता चांगले उत्पन्न मिळवत आहेत.

गावडे पती-पत्नी गेल्या सहा वर्षांपासून दर उन्हाळ्यात मलबेरीची पिकलेली काळ्या रंगाची फळे सकाळी तोडतात. ती व्यवस्थित पॅक करून चारशे ते पाचशे रुपये बाजारभावाने विक्री करतात. पुण्यातील चवीने खाणारे अनेक खवय्ये सोशल मीडियाद्वारे त्यांच्याशी जोडले गेले आहेत. या फळांना शहरातील ग्राहकांकडून मोठी मागणी असून, नैसर्गिक आणि आरोग्यदायी मेवा म्हणून त्याला चांगला बाजारभावही मिळतो.


गावडे यांनी पारंपरिक शेतीबरोबरच बाजारपेठेची गरज ओळखून शेतात सेंद्रिय स्ट्रॉबेरीची लागवड केली. त्यांच्यामुळे तालुक्यात प्रथमच स्ट्रॉबेरीचे उत्पादन सुरू झाले. सात वर्षांपूर्वी त्यांनी बांधावर मलबेरीची रोपे लावली. त्याची व्यवस्थित निगा राखल्याने रोपांची जोमदार वाढ झाली.


खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट फार्मर’
सध्या अनेक शेतकरी शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याची खंत व्यक्त करतात. मात्र बदलत्या काळानुसार पिकांची निवड, थेट विक्री आणि नावीन्यपूर्ण प्रयोग केल्यास शेतीही सोन्याची होऊ शकते, हे मधुकर गावडे यांनी दाखवून दिले. सिमेंटच्या वाढत्या जंगलातही हिरवाई जपणारे आणि रानमेव्याला बाजारपेठ मिळवून देणारे गावडे आजच्या तरुण शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने ‘‘स्मार्ट फार्मर’’ आहेत.


मलबेरी हे एक गोड, रसाळ आणि पौष्टिक रानफळ आहे. हे फळ दिसायला लांबट आणि जांभळट-काळ्या किंवा लाल रंगाचे असते. चव गोड, किंचित आंबट आणि अतिशय रसाळ असते. एकदा लागवड केल्यावर अनेक वर्षे उत्पादन मिळते.
- मधुकर गावडे, शेतकरी

04878

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd T20I: वेस्ट इंडिजला आली लहर, केला कहर! भारताचे २५० धावांचे विक्रमी लक्ष्य सहज पार केले, शे होपचे नाबाद शतक

Beed News : विद्यार्थी खरेदी-विक्रीतून बोगस संचमान्येचा महाघोटाळा; चंपावती विद्यालयात आढळले उत्तराखंडचे ३ बोगस विद्यार्थी

Ganja Farm Seized : गाढेजळगाव शिवारात गांजाची शेती उघड; ४३० झाडे जप्त, १८ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल, शेतकरी आरोपीला अटक

IND vs WI 2nd T20I: W,W,W! ज्याने आस दाखवली, त्यानेच माती खाल्ली; Mayank Yadav च्या चूकीने मॅच गेल्यात जमा, नेमकं काय घडलं?

Delhi Protest: 30 हजार जवान तैनात अन् 200 जण ताब्यात; CJPच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत काय-काय घडतंय?

SCROLL FOR NEXT