पुणे

सर्पदंश पीडित बालिकेच्या प्रकृतीची चौकशी

CD

सर्पदंश पीडित बालिकेच्या
प्रकृतीची मुख्यमंत्र्यांकडून चौकशी
नागपूर, ता २० : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे सुरू असलेल्या विविध विकास कामांची तसेच वैद्यकीय सुविधांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पाहणी करून समाधान व्यक्त केले. त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई येथील सर्पदंश पीडित बालिकेच्या प्रकृतीचीही मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली.
नागपुरातील मेडिकल आणि मेयो या दोन मोठ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना विविध विकास कामांसाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामांची प्रगती पाहण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी येथे भेट दिली. रुग्ण तसेच रुग्णांचे नातेवाईक यांच्याही दृष्टीने या दोन्ही रुग्णालयांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत तसेच अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांची निर्मिती या ठिकाणी केली जात आहे. मेडिकलमध्ये एनआयसी, पीआयसीयू येथे भेट देऊन पीआयसीयूमधील व्हेंटिलेटर युनिटचे लोकार्पण यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आदिवासी आश्रम शाळेतील सर्पदंश घटनेतील एक होण्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेतील एक विद्यार्थिनी नागपूरला मेडिकलमध्ये दाखल आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज या विद्यार्थिनीची भेट घेऊन तिच्या आईशी संवाद साधला. त्याचप्रमाणे या बालिकेच्या प्रकृतीची योग्य काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी डॉक्टरांना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JPSC-JSSC परीक्षांवरून मोठा ट्विस्ट! भरती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय थांबवला; झारखंड सरकारला हायकोर्टाचा मोठा झटका

Pakistan News: शहबाज शरीफ सरकारला मोठा धक्का! पाकिस्तानातील २५ मंत्रालये बनावट; तातडीने बरखास्त करण्याची शिफारस

‘रात्री जेवणाचा प्रश्न असतो म्हणून तिचं कौतुक करतो’ अशोकमामा निवेदिता यांच्याबद्दल बोलताना म्हणाले; 'मला संसारातलं...'

Latest Marathi News Live Update: पालघर महावितरणचा कर्मचारी लाच घेताना अटक

ENG vs PAK: इंग्लंडच्या गोलंदाजांनी चेंडूचे दोन तुकडे का केले? पाकिस्तानच्या पहिल्या डावानंतर नेमकं काय घडलं? Video viral

SCROLL FOR NEXT