PNE26W34807
सोलापूर : पावसाने हजेरी लावल्यानंतर सात रस्ता परिसरात टिपलेले छायाचित्र.
---
आषाढाच्या पहिल्या दिवशी पावसाची हजेरी
उशिरापर्यंत रिमझिम; वाऱ्याने ढग गेले वाहून
---
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १५ : आषाढ महिन्याला आज प्रारंभ झाला. नेहमीप्रमाणे आज दुपारपर्यंत उन्हाचा चटका जाणवत होता. दुपारी ४ नंतर सोलापूरच्या वातावरणात बदल झाला. काळेभोर दाटून आलेल्या ढगांमुळे आज सोलापुरात मुसळधार पाऊस होणार, अशीच शक्यता निर्माण झाली होती. वाऱ्याच्या वेगाने पुढे निघून गेले, सायंकाळी ५ च्या सुमारास मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला, मुसळधार पावसाने मात्र सोलापूरकरांना हुलकावणीच दिली.
गेल्या काही दिवसांपासून सोलापूरचे कमाल तापमान सातत्याने वाढत आहे. आजही सोलापूरचे तापमान ३४.४ अंश सेल्सिअस एवढे होते. वाढलेल्या उन्हाच्या चटक्यासोबतही उकाडा होता. आज सोलापुरात आर्द्रता ७५ टक्क्यांवर पोचल्याने वातावरणात उकाडा व दमटपणा होता. दिवसभराच्या उकाड्यावर सायंकाळच्या सुमारास पावसाने सुखद फुंकरच घातली. पावसाच्या रिमझिममुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला होता. हा पाऊस संततधार पद्धतीने असल्याने या पावसाचा आनंद अनेकांनी लुटला, सायंकाळच्या सुमारास शाळा व कार्यालय सुटण्याच्या वेळेसच पावसाने हजेरी लावल्याने या पावसात भिजण्याचा आनंद अनेकांनी लुटला. सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत या पावसाची नोंद ४.८ मिलिमीटर एवढी झाली. सोलापूर व परिसरात रात्री उशिरापर्यंत ढगाळ वातावरण व पावसाची रिमझिम सुरूच होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.