पुणे

दुचाकीस्वारावर ब्लेडने वार

CD

दुचाकीस्वारावर ब्लेडने वार;
डोक्यात ७ टाके, पोटावर जखमा
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २३ : दुचाकीवरून जाताना मागून भरधाव आलेल्या वाहनचालकाने ओव्हरटेक केले आणि पुढे जाऊन अचानक गाडी थांबवली. फिर्यादी अजय अंबादास मोने (रा. भारतरत्न इंदिरा नगर, सोलापूर) यांची दुचाकी समोरील गाडीला धडकत होती, पण फिर्यादीने गाडी आवरली. याचा जाब विचारताना संशयित आरोपींनी शिवीगाळ करून पाकिटातील ब्लेड काढून फिर्यादीवर वार केले. यात अजय यांच्या डोक्यात सात टाके पडले आहेत.
बुधवारी दुपारी चारच्या सुमारास जुना कुंभारी नाका येथील रोडवरून जात असताना फिर्यादी अजय मोने यांना ओव्हरटेक करून एक गाडी पुढे गेली. मोने यांना पेट्रोल पंपाकडे वळायचे होते, पण समोरील वाहन चालक अचानक वाटेतच थांबला. त्यावेळी मोने यांची दुचाकी त्या गाडीला धडकणार होती. अचानक वाटेत का थांबला, अपघात झाला असता अशी विचारणा करताना राघवेंद्र हणुमंत खुने (रा. वेणुगोपाल नगर, सोलापूर) व अज्ञात एकाने शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर खुने याने पाकिटातील ब्लेड काढून अजयच्या डोक्यात, पोटावर, हातावर वार केले. यात अजयच्या डोक्यात टाके पडले असून पोटावर, हातावर ब्लेडचे वार आहेत. अजय मोने यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. संशयित आरोपींचा शोध सुरू आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार मंजुळा वाघमोडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT