पुणे

शहर गुन्हेगारी

CD

शेजाऱ्याने केली
विटाने मारहाण
सोलापूर : घराशेजारील राजू चव्हाण (रा. हत्तुरे वस्ती, सोलापूर) याने शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. १६ मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास हत्तुरे वस्तीत ही मारहाण झाल्याची फिर्याद गणेश विठ्ठल गायकवाड यांनी विजापूर नाका पोलिसांत दिली. राजू चव्हाण याने विटाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने सर्वांगास मुकामार लागला असून, डोक्यात जखम झाल्याचेही फिर्यादीने पोलिसांना सांगितले. पोलिस हवालदार मणुरे तपास करीत आहेत.
-------------
मागील भांडणातून
चौघांकडून मारहाण
सोलापूर : मागील भांडणाच्या रागातून महेश सुरेश बनसोडे, सिद्धेश्वर सुरेश बनसोडे, अभिषेक नवनाथ मोहिते व वैभव नवनाथ मोहिते (सर्वजण रा. रविवार पेठ, सोलापूर) यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची फिर्याद विजय राजू क्षीरसागर यांनी जेलरोड पोलिसांत दिली. ‘आमच्या घरातील भांडणे सोडविणारा तू कोण’ असे म्हणून महेश बनसोडे याने लोखंडी सळईने मारहाण केली. तर सिद्धेश्वरने लोखंडी कोयत्याने डोक्यात वार केला. अभिषेक व वैभव यांनी फरशीने मारहाण केली. दुचाकीचेही नुकसान केले, असेही फिर्यादीत नमूद आहे. त्यावरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. १६ मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जय हॉस्पिटलसमोर ही मारहाण झाली होती. पोलिस हवालदार कांबळे तपास करीत आहेत.
---
‘ई-चालान’चा दंड
वाहनचालक भरत नाही
सोलापूर : शहर-जिल्ह्यातील रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना वाहतूक पोलिसांकडून ‘ई-चालान’द्वारे ऑनलाइन दंड केला जातो. सोलापूर शहरातील सुमारे दोन लाख बेशिस्त वाहनांवर वाहतूक पोलिस दंडात्मक कारवाई करतात. मात्र, दंड भरणाऱ्या वाहनचालकांची संख्या ५० हजारसुद्धा नाही. लोकअदालतीपूर्वी अशा वाहनचालकांना समन्स, वॉरंट बजावले होते, तरीपण ते हजर राहात नाहीत. दंडाची अर्धी रक्कम माफ करा, अशी त्यांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी कारवाई केलेल्या सुमारे आठ लाख वाहनांवर कोट्यवधींचा दंड प्रलंबित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yunus Shaikh: कैसे हराया... फेम सहर शेखच्या वडिलांना शिंदेसेनेत मानाचं पान, युनूस खान यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती

IND vs NZ ODI Squad : निवड समितीच्या डोक्यात काय शिजतंय? जसप्रीत बुमराहचा वन डे संघात समावेश अनिश्चित, दुखापत की आणखी काही कारण? Inside Story

ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचा संप, बैठकीनंतरही अंमलबजावणी केली नाहीय; पडळकरांचा शिंदेंच्या मंत्र्यावर निशाणा

Latest Marathi News Update : “साहेब, ५ हजार रुपयांत काय होणार? शेतकऱ्याचं दुःख एकदा बांधावर येऊन समजून घ्या!”; हर्षवर्धन सपकाळ यांचे ट्विट

Pune Leopard News: सिंहगडाच्या पश्चिमेकडे बिबट्याची दहशत; तासाभरात तीन दुचाकीस्वारांवर हल्ले, युवती जखमी

SCROLL FOR NEXT