पुणे

सोमेश्वरसाठी तीन पॅनेलमध्ये ''काँटे की टक्कर''

CD

वडगाव निंबाळकर, ता. ८ : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून गुरुवारी (ता. ८) तीनही पॅनेलच्या प्रचाराने कारखान्याचे कार्यक्षेत्र ढवळून निघाले. प्रमुख नेत्यांसह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमेदवारांनी गावागावांत संपर्क साधत मतदारांपर्यंत आपली भूमिका पोहोचविण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी (ता. ९) प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने तीनही पॅनेलच्या सांगता सभांकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेलच्या प्रचारासाठी मंत्री दत्तात्रेय भरणे, मंत्री मकरंद पाटील, आमदार विजय शिवतारे, सचिन पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्यासह माळेगाव कारखान्याचे पदाधिकारी, नगरपालिका व जिल्हा परिषद पदाधिकारी प्रचारात सक्रिय झाले आहेत. विविध गावांमध्ये सभा, बैठका आणि सभासदांशी प्रत्यक्ष संपर्क साधत पॅनेलच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

दुसरीकडे, पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेलच्या प्रचाराची धुरा आमदार संजय जगताप, माणिकराव झेंडे आणि सुदामराव इंगळे यांनी सांभाळली. या गटाच्या नेत्यांनीही कार्यक्षेत्रातील विविध गावांमध्ये दौरे करीत सभासदांच्या भेटीगाठी घेत प्रचाराला वेग दिला. दोन्ही पॅनेलच्या प्रचारामुळे गुरुवारी दिवसभर परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

युगेंद्र पवार यांच्या श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेलने मात्र जाहीरनाम्यातील विधायक मुद्द्यांवर भर देत प्रचार सुरू ठेवला. कारखान्याचा कारभार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे नेण्याची भूमिका मांडत ऊस उत्पादक सभासदांच्या हिताचे प्रश्न, कारखान्याचे भविष्यातील नियोजन आणि सक्षम व्यवस्थापन या मुद्द्यांवर प्रचार करण्यात आला.

माहोल रंगला
प्रचाराच्या अंतिम टप्प्यात चौकाचौकांत मोठे कटआउट, फ्लेक्स आणि प्रचारफलक उभारण्यात आले आहेत. प्रचाराच्या वाहनांमधून सुरू असलेला ध्वनिप्रचार, गावागावांतील बैठका आणि उमेदवारांच्या भेटीगाठींमुळे निवडणुकीचा माहोल रंगला आहे.

व्हिजन स्पष्ट करण्याची आज शेवटची संधी
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी तिन्ही पॅनेल आपापल्या सभांमधून शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता असून प्रमुख नेते सभासदांसमोर कोणते मुद्दे मांडतात, याकडे लक्ष लागले आहे. शेवटच्या दिवशीच्या भाषणांमधून मतदारांना अंतिम आवाहन करताना कारखान्याच्या भविष्यासंदर्भातील भूमिका आणि विकासाचे व्हिजन स्पष्ट करण्याची संधी तिन्ही पॅनेलना मिळणार आहे.

तीन ठिकाणी आज सांगता सभा
करंजे पूल येथील बाजार तळ : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेलची सभा.
सोमेश्वर कारखान्याच्या मुख्य कार्यालयासमोर : सायंकाळी पुरुषोत्तम जगताप यांच्या लोकनेते पॅनेलची सभा.
करंजे पूल चौकातील पेट्रोल पंपाजवळ : युगेंद्र पवार यांच्या श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेलची सभा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Rain Alert : मोठी बातमी! माॅन्सूनच्या एक्झिट दरम्यान 22 राज्यांत मुसळधार पावसासह वादळाचा अलर्ट; 70 किमी स्पीडने वाहणार वारे, महाराष्ट्रात कशी स्थिती?

Pocso News : फेसबुकवरील मैत्री पडली महागात ! हॉटेलमध्ये बोलावून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Palghar Earthquake : पालघरला भूकंप,३.७ रिश्टर स्केलचा धक्का; तलासरी तालुक्यातील कुर्झे केंद्रबिंदू, सात किलोमीटर खोलीवर भूकंपाची नोंद

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्र्यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले

नानांच्या अखेरच्या प्रवासात पत्नी-मुलाची अवस्था पाहून डोळे पाणावतील; नीलकांती आणि मल्हार यांचा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT