घरचे सोयाबीन
बियाणे जतन करा
फोटो B27633
कैलास देवकर
ॲग्रोवन वृत्तसेवा
वाशीम : यंदा प्रतिकूल हवामान आणि कमी व असमान पर्जन्यमानामुळे अनेक भागांत सोयाबीन उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामात दर्जेदार बियाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेता शेतकऱ्यांनी आत्तापासूनच नियोजन करून घरचे सोयाबीन बियाणे जतन करावे, असे आवाहन मालेगावचे तालुका कृषी अधिकारी कैलास देवकर यांनी केले आहे.
यंदाच्या हंगामात सोयाबीन पिकाला हवामानातील प्रतिकूल बदलांचा फटका बसला आहे. परिणामी, पुढील हंगामासाठी आवश्यक दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्याबाबत अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. ऐन पेरणीच्या वेळी बियाण्याची कमतरता भासल्यास शेतकऱ्यांची धावपळ होण्याबरोबरच बाजारातून बियाणे खरेदीसाठी अतिरिक्त खर्च करावा लागू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच तयारी करणे आवश्यक आहे.
पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील निरोगी, सुदृढ आणि चांगल्या गुणवत्तेच्या सोयाबीन पिकातून बियाण्याची निवड करावी. निवड केलेले बियाणे योग्य प्रकारे वाळवून, त्यातील ओलावा नियंत्रित ठेवत सुरक्षित ठिकाणी साठवावे. तसेच पेरणीपूर्वी बियाण्याची उगवणक्षमता तपासून घ्यावी. यामुळे बियाण्याची गुणवत्ता टिकविण्यास आणि पेरणीचे नियोजन करण्यास मदत होईल. संभाव्य बियाणे टंचाई टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी घरच्या बियाण्याला प्राधान्य देऊन आगामी खरीप हंगामाची तयारी आत्तापासूनच करावी, असे आवाहन देवकर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.