Spacious Auditorium for Ghodegaon Civil and Criminal Court mumbai high court judge Revati Mohite Dere Sakal
पुणे

Manchar News : घोडेगाव दिवाणी व फौजदारी न्यायालयासाठी प्रशस्त सभागृह - रेवती मोहिते डेरे

घोडेगाव न्यायालयाला न्यायमूर्ती मोहिते-डेरे यांनी भेट दिली

डी के वळसे पाटील

मंचर :“घोडेगाव (ता.आंबेगाव) येथील दिवानी व फौजदारी न्यायालयात ३०० लोकांची क्षमता असलेले सभागृहचे बांधकाम सुरू केले जाईल.अत्याधुनिक व्हिडिओ कॉन्फरन्स,ई फायलिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.” असे मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांनी सांगितले.

घोडेगाव न्यायालयाला न्यायमूर्ती मोहिते-डेरे यांनी भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांचा सन्मान आंबेगाव तालुका वकील संघाचे अध्यक्ष अँड निलेश शेळके, अँड बाळासाहेब पोखरकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी अँड मारुती ठोंबरे,अँड.मुकुंद काळे, अँड अनिल पोखरकर, अँड. संजय अर्विकर, अँड.प्रकाश शहाणे, अँड गायत्री काळे उपस्थित होते.

न्यायमूर्ती मोहिते-डेरे म्हणाल्या “उच्च न्यायालय वकील संघाच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक आहे. आज पर्यंत जेवढी न्यायालय पाहिले त्यामध्ये तालुका पातळीवरील सर्वोत्कृष्ट न्यायालय म्हणून घोडेगाव न्यायालयाचा परिसर आहे. मी परत घोडेगाव येथील पायाभूत सुविधा व इतर प्रश्न संदर्भात चर्चा करण्यासाठी येईल.”

घोडेगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एस डॉक्टर व पुणे जिल्हा प्रमुख न्यायाधीश शाम चांडक यांनी भेट देऊन पायाभूत सुविधांची पाहणी केली. यावेळी घोडेगाव वकील संघाच्या वतीने घोडेगाव येथे वरिष्ठ स्तर दिवानी न्यायालय व्हावे याबाबतचे निवेदन अँड निलेश शेळके यांनी दिले. अँड मुकुंद वळसे पाटील यांनी सूत्रसंचालन व अँड सागर गावडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Snake Video : बँकेत घुसला साप, कर्मचाऱ्यांसह ग्राहकांची उडाली धांदल; काऊंटर सोडून कॅशियर पळाला अन्... मजेशीर व्हिडिओ व्हायरल

फडणवीस सरकारची पोलखोल! केंद्र सरकारला अतिवृष्टीसंदर्भातील मदतीचा प्रस्तावच दिला नाही; कृषीमंत्र्यांची लोकसभेत माहिती...

Latest Marathi News Live Update : अंधेरी पश्चिमेत 30 हजार दुबार मतदारांचा मुद्दा तापला; मनसे आक्रमक, ७ दिवसांचा अल्टिमेटम

Supreme Court : 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी माजी मुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

MPSC Geologist Result 2025 : एमपीएससी कनिष्ठ भूवैज्ञानिक निकाल तीन वर्षांपासून प्रलंबित; उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर

SCROLL FOR NEXT