Sakal Foundation Sakal
पुणे

‘जपानमधील संधी’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

झूम वेबिनारमध्ये राज्यभरातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा

पुणे - भारत आणि जपान यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्ताने सकाळ माध्यम समूहातील ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’, इंडो-जपान बिझनेस कौन्सिल (IJBC), केयो युनिव्हर्सिटीची इंडिया जपान लॅबोरेटरीज (IJL) यांच्यावतीने आणि पुण्यातील सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्याने सर्व विद्या शाखांमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘भारतीय विद्यार्थ्यांसाठी जपानमधील शिक्षणाच्या व नोकरीच्या विविध संधी’ याविषयी ऑनलाइन झूम वेबिनारच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेला राज्यभरातून महाविद्यालयीन विद्यार्थी वर्गांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

प्रमुख मार्गदर्शकांचे मनोगत

१) युजी निशिकावा (वरिष्ठ संशोधक - जपान सायन्स अँड टेक्नॉलॉजी एक्स्चेंज सेंटर) ः जपानमधील अत्याधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान आणि संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी तसेच, विद्यार्थ्यांना अनुभव घेता यावा यासाठी ‘जपान सायन्स अँड टेक्नॉलॉजी एक्स्चेंज सेंटर’च्या वतीने आणि जपानमधील शासनाच्या तसेच, उद्योग व शिक्षण विभागाच्या सहकार्याने ‘साकुरा सायन्स एक्स्चेंज प्रोग्रॅम’ २०१४ पासून राबविण्यात येत आहे. या प्रोग्रॅमद्वारे इतर देश आणि प्रदेशातील विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात उच्च शिक्षण व संशोधन करू इच्छिणाऱ्या प्रतिभावान तरुणांना व विद्यार्थ्यांना जपानमध्ये संधी दिली जाते. मागील सहा वर्षांच्या कालावधीत तेहतीस हजाराहून अधिक तरुणांनी या कार्यक्रमासाठी जपानला भेट दिली आहे.

२) नोरिको नासुकावा (संस्थापक संचालक - निहोंगो सेंटर , नवीन दिल्ली) ः भारतातील विद्यार्थ्यांना जपानमधील करिअरच्या चांगल्या संधींसाठी जपानी भाषा येणे आवश्यक आहे. नवीन दिल्लीतील निहोंगो सेंटर येथे जपानी भाषेचे शिक्षण दिले जाते. जपानी भाषेच्या वर्गाबाबत विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार निहोंगो सेंटरमध्ये नावीन्यपूर्ण आणि सर्वात प्रभावी अध्यापन पद्धतीचा अवलंब करून, विशेष अभ्यासक्रम मोड्यूलस डिझाइन केलेले आहेत.

भारतीय विद्यार्थ्यांना www.studyinjapan.go.jp/en/planning/scholarship/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन, जपानमधील उच्च शिक्षणाच्या व करिअरच्या संधींविषयी तसेच, शिक्षणासाठी जपानमध्ये असणाऱ्या विविध शिष्यवृत्त्या संदर्भात अधिक माहिती घेता येईल. तसेच, विद्यार्थ्यांना जपानमधील शिक्षण व करिअर संदर्भात काही प्रश्न असतील तर info@ijbc.org या मेल आयडीवर संपर्क साधू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Career Growth: ज्याला तीन लाख वार्षिक पगाराच्या कामावरून कंपनीने काढलं, त्याच तरुणाला आली दुबईतील १.५ कोटींच्या नोकरीची ऑफर

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

CBI Arrests ED officers : दुसऱ्यांवर धाडी टाकणाऱ्या ED अधिकाऱ्यांवरच CBI ची झडप! केसमधून वाचवण्यासाठी केला होता 'हा' मोठा सौदा

Latest Marathi News Live Update : नवजात बाळाचा मृत्यूनंतर काही दिवसांतच मातेचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT