पुणे

समृद्ध जीवन आर्थिक घोटाळ्यातील महत्वाच्या कागदपत्रांचा साठा सीआयडीकडून जप्त

सकाळ वृत्तसेवा

पुणे ः समृद्ध जीवन आर्थिक घोटाळ्याचा उलगडा करणारी व आत्तापर्यंत लपवून ठेवण्यात आलेली महत्वाची कागदपत्रे राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुरूवारी केलेल्या कारवाईत जप्त केली. एक दुकान व दोन सदनिकांमध्ये भरून ठेवलेल्या कागदपत्रे ताब्यात घेण्याचे काम "सीआयडी'च्या पथकाकडून दिवसभर सुरू होते. या कागदपत्रांमुळे पोलिसांच्या तपासाला आणखी गती मिळण्याची दाट शक्‍यता आहे.

शेतीला पुरक व्यावसाय म्हणून शेळीपालन व अन्य व्यावसायाची जोड देत त्यातुन मोठा आर्थिक फायदा मिळण्याचे आमिष दाखवून महेश मोतेवार व त्याच्या साथीदारांनी महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातील शेतकरी व गुंतवणुकदारांची फसणूक केली होती. याप्रकरणी समृद्ध जीवनच्या महेश मोतेवारविरुद्धा 22 राज्यात 28 गुन्हे दाखल आहेत. राज्यात विविध ठिकाणी घडलेल्या या घोटाळ्याचा तपास काही वर्षांपुर्वी "सीआयडी'कडे आला. या गुन्ह्यात एकूण 25 बड्या व्यक्तींचा सहभाग असून त्यापैकी 17 जणांना "सीआयडी'ने यापुर्वीच बेड्या ठोकल्या आहेत. तर 8 जण या प्रकरणामध्ये फरारी आहेत. महेश मोतेवार सध्या ओरीसा राज्यातील कारागृहामध्ये आहे.

काही दिवसांपुर्वीच मोतेवारने श्रीमंत दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या मुर्तीला अर्पण केलेला 50 ते 60 लाख रुपये किंमतीचा सोन्याचा हार "सीआयडी'ने जप्त केला होता. "सीआयडी'च्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिक्षक संदिप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक मनीषा धारणे पाटील यांच्याकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. त्यानुसार, गुरूवारी सकाळी समृद्ध जीवन आर्थिक घोटाळा प्रकरणातील महत्वाची कागदपत्रे पुण्यात दुसरीकडे लपविली जाणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पथकाकडून कागदपत्रे घेऊन जाणाऱ्या टेम्पोवर लक्ष ठेवले जात होते. पथकास टेम्पोचा क्रमांक मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला. त्यावेळी संबंधीत टेम्पो हा नऱ्हे येथील समृद्ध जीवन पार्क येथे गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार, पथकाने संबंधीत ठिकाणी छापा घालून एक दुकान व दोन सदनिका भरुन ठेवलेली कागदपत्रे जप्त केली. गुरूवारी दिवसभर कागदपत्रांचा पंचनामा सुरू करण्याचे काम पथकाकडून सुरू होते. मनीषा धारणे पाटील, पोलिस निरीक्षक सीताराम फंड, विठ्ठल पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक अरुण मोरे, पोलिस हवालदार विकास कोळी, सचिन उबाळे, शांतवन साळवे, पोलिस कर्मचारी आशा जाधव, कविता नाईक, भाग्यश्री मोहिते, आर.डी.साळुंके, हनुमंत कांबळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inside Story: सूर्यकुमार यादवचा 'काटा' कोणी काढला? पडद्यामागून असा 'गेम' केला; श्रेयस नव्हे, कर्णधारपदासाठी २ नावं सुचवलेली, पण...

गौतमने फसवलेल्या स्त्रियांना घेऊन लग्नाच्या मंडपात धडकणार जय आणि शर्वरी; 'सनई चौघडे'मध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा!

६ विकेट्स घेऊनही मानव सुथारला नाही मिळाल मेडल; BCCI च्या ड्रेसिंग रुममध्ये दुसराच खेळाडू ठरला 'इम्पॅक्ट प्लेअर'

Latest Marathi News Update : जिल्हा प्रशासन आणि एनएचएआयद्वारे अतिक्रमण पाडण्याची मोहीम

Nashik Kumbh Mela : 2027 सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक सज्ज! आयटीआय ते पिंपळगाव बहुला मार्गावरील 'या' मोठ्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात, पाहा कामाची सद्यःस्थिती

SCROLL FOR NEXT