FILE PHOTO sakal
पुणे

पुणे-सोलापूर रस्त्यावर ‘एसटी’वर दगडफेक

एसटी बसचालक रवींद्र शिंदे यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुढे जाण्यास जागा न दिल्याने धावत्या एसटीवर दुचाकीस्वार आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी दगडफेक केल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर सोरतापवाडी येथे घडली. दगडफेक करणाऱ्यांनी एसटी बसचालकाला मारहाणही केली.

याबाबत एसटी बसचालक रवींद्र शिंदे (वय ३८, रा. चिवर, ता. तुळजापूर) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एसटी बसचालक शिंदे पुणे-सोलापूर रस्त्याने तुळजापूरकडे सायंकाळी सहाच्या सुमारास एसटी घेऊन निघाले होते. सोरतापवाडी परिसरात पाठीमागून येणाऱ्या दुचाकीस्वारास पुढे जाण्यास जागा न दिल्याने दुचाकीस्वाराने एसटी बस थांबविण्याचा इशारा केला.

दुचाकीस्वार आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी शिंदे यांना शिवीगाळ केली. एसटी बसच्या काचेवर दगडफेक केली. शिंदे यांच्या डोक्यात दगड फेकून मारला. त्यांना मारहाण करून दुचाकीस्वार आणि साथीदार पसार झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Flood Rescue : शाहूंच्या भूमीत क्रांतिकारी पाऊल! पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सज्ज झाली देशातील पहिली तृतीयपंथीयांची आपत्ती व्यवस्थापन टीम, तुम्हीही कराल सॅल्यूट

HTBT Cotton Seeds Raid : बुलढाणा जिल्ह्यात HTBT कापूस बियाण्यांवर मोठी कारवाई; ८.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Pali Bus Stand : पाली बसस्थानक नूतनीकरणासाठी मनसेचे परिवहन मंत्र्यांना मनसेचे साकडे; वेळेत काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Video: दरवर्षी बाळंतपण! वंशाला हवेत दोन दिवे; पाचव्यानंतर सहावं पोटात, डॉक्टरने पती-पत्नीला झापझाप झापलं; व्हिडीओ व्हायरल

ज्याची लायकी नाही त्याला घेतला की... बायकोलाच रोल दिला बोलणाऱ्यांना प्रवीण तरडेंचं चोख उत्तर; म्हणाले-

SCROLL FOR NEXT