protest sakal
पुणे

ठाण्यातील घटनेचा इंदापूरात तीव्र शब्दात निषेध

इंदापूर नगरपरिषदेचे संपूर्ण कामकाज कडकडीतरित्या बंद ठेवून घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.

डॉ. संदेश शहा

इंदापूर : ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे या आपले कर्तव्य बजावत असताना एका माथेफिरूने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांच्या हाताची बोटे कापली गेली,तसेच डोक्यास देखील मोठी जखम झाली आहे. प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध इंदापूर नगरपरिषद प्रांगणात करण्यात आला. इंदापूर नगरपरिषदेचे संपूर्ण कामकाज कडकडीतरित्या बंद ठेवून घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.

बंदमध्ये प्रशासकीय अधिकारी वर्षा क्षिरसागर ,सभा अधीक्षक गजानन पुंडे,इंदापूर परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मोहन शिंदे, कर निरीक्षक श्रद्धा वळीवडे, पाणी पुरवठा पर्य वेक्षक सुरेश सोनवणे,नोडल ऑफिसर सुजय मखरे, सहाय्यक आरोग्य निरीक्षक लिलाचंद पोळ, भागवत मखरे, सुनील लोहिरे, नगर परिषद सर्व विभागातील कर्मचारी, अधिकारी सहभागी झाले होते.

यासंदर्भात श्रद्धा वळीवडे म्हणाल्या, कर्तव्य बजावणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरावर अजामीनपात्र गुन्हा नोंदवून कारवाई व्हावी.

सभा अधीक्षक गजानन पुंडे म्हणाले, अश्या घटनेमुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खच्चीकरण होते. याला पायबंद घालणे गरजेचे आहे. अध्यक्ष मोहन शिंदे म्हणाले, भविष्यात असे प्रकार होवू नयेत म्हणून कायदे कडक करणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT