Pune Crime 
पुणे

Student Beaten by Teacher: पुण्यात शिक्षिकेची विद्यार्थ्याला मारहाण; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालकांनी थेट पोलिसांत धाव घातली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : भर वर्गातच एका शिक्षेकेनं विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुण्यातील शाळेत घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली असून हा मारहाणीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर पालकांनी थेट पोलिसांत धाव घेत संबंधित शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली आहे. (student beaten up by teacher in pune school a police complaint was filed after video went viral)

सुत्रांच्या माहितीनुसार, वर्गात काही विद्यार्थी घोळका करून बसले होते तसेच ते वर्गात दंगा करत असल्यानं शिक्षिकेनं विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा प्रकार पुण्यातील शाळेत घडला आहे. याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांनी विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. हा मारहाणीचा प्रकार विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये कैद केला. (Latest Marathi News)

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनीही तो पाहिला त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिसांत शिक्षकेविरुद्ध तक्रार दाखल केली. शिक्षिकेनं मुलाला मारहाण करण्याचा प्रकार गंभीर असून त्याबाबत शिक्षण संस्थेनं त्यांना बडतर्फ करावं. यापूर्वी देखील या शिक्षिकेनं बऱ्याच मुलांना मारहाण केली आहे, असा आरोपही पालकांनी केला आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Alert : जून-जुलैमध्येही उष्णतेची लाट कायम राहणार; माॅन्सून श्रीलंकेवरच रेंगाळला, 7 दिवसांत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता, आयएमडीचा नवा अंदाज काय?

Pune News: हिंजवडीतील IT कंपनी अचानक बंद? पगार नाही, चेक बाऊन्स... ७०० इंटर्न आणि कर्मचाऱ्यांचा वेतन घोटाळा उघड

Abhishek Banerjee Attack : अभिषेक बॅनर्जींवर जीवघेणा हल्ला; विटा-दगडं फेकत डोळे आणि छातीवर वार, ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाल्या, सत्ताधारी खुनी...

Hero New Bike : पेट्रोल पंपावर जायचं विसरा! लॉन्च झाली Hero ची दमदार बाइक; 72km मायलेजसह जबरदस्त स्मार्ट फीचर्स, किंमत फक्त...

Gokul Politics : बंटी पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक'! 'गोकुळ'साठी कोरेंची मध्यस्थी अन् चंद्रकांतदादांनी काढला तोडगा, गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT