सुधीर मुनगंटीवार यांचे छायाचित्र
शिंदेंचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न जनतेला रुचणार नाही
सुधीर मुनगंटीवार; पंढरपूर येथे घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन
सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. १५ : भाजप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्त्व कदापीही कमी करणार नाही. मात्र, भाजपने तसा प्रयत्न केला तर तो जनताही खपवून घेणार नाही, असे विधान माजीमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज पंढरपुरात केले.
शरद पवारांचा पक्ष एनडीएसोबत येऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सुरू असतानाच मुनगंटीवार यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मुनगंटीवार आज पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मुनगंटीवार म्हणाले, ‘राजकारणात कोणीही कोणाचे महत्त्व कमी करू शकत नाही. एखाद्या व्यक्तीचे महत्त्व जाणीवपूर्वक कमी करण्याचे काहीही कारण नाही. जनता जोपर्यंत त्या नेत्याच्या पाठीशी आहे, तोपर्यंत त्यांचे महत्त्व कोणीही कमी करू शकत नाही. एकनाथ शिंदे हे आमचे मित्र आहेत. एखाद्या व्यक्तीच्या चुका त्या पक्षाचे महत्त्व कमी करत असतात. जेव्हा भाजप सत्तेत नव्हती आणि महाविकास आघाडीची सत्ता होती, त्यावेळी सत्तेतून बाहेर पडणे हे एक क्रांतिकारी पाऊल होते. विरोधी पक्षातून फूट पडणे ही नैसर्गिक बाब मानली जाऊ शकते. मात्र, आजपर्यंत देशात काँग्रेसने जेव्हा-जेव्हा पक्ष फोडला, तेव्हा तो विरोधी पक्ष होता. पहिल्यांदाच सत्तारूढ पक्षातील आठ मंत्री, शिवसेनेचे 40 आमदार आणि 10 अपक्षांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे भाजपसोबत आले. एकनाथ शिंदे आणि त्यांचा शिवसेना पक्ष आमचा सहकारी आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष त्यांचे महत्त्व कदापीही कमी करणार नाही."
चौकट...
शरद पवारांचा पक्ष एनडीएसोबत येण्याबाबत शंका
शरद पवारांचा पक्ष एनडीएसोबत येण्याबाबत ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांनी पंधरा दिवसांपूर्वीच शरद पवारांचा पक्ष एनडीएसोबत येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा करावी लागेल. वैयक्तिकरित्या मला शरद पवारांचा पक्ष एनडीएसोबत येईल, याबाबत शंका आहे. मात्र, जर त्यांचा पक्ष एनडीएचा घटक झाला, तर पंधरा दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावरील जनतेचा विश्वास कमी होईल.’’
चौकट...
‘देवाचीच इच्छा’
राज्याच्या विधिमंडळात विविध प्रश्न मांडत असूनही आपण मंत्रिमंडळाबाहेर आहात, असे पत्रकारांनी विचारले असता मुनगंटीवार यांनी ‘देवाची इच्छा,’ एवढेच उत्तर दिले. त्यावर ‘कुठल्या देवाची?’ असा प्रतिप्रश्न पत्रकारांनी केला असता, ‘देवाचीच इच्छा असेल,’ असे म्हणत मुनगंटीवार उत्तर दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.