पुणे

आबांनी केली शेतकऱ्यांची दिवाळी गोड

CD

‘किसन वीर’, ‘खंडाळा’कडून
मंगळवारपासून साखर वाटप

भुईंज, ता. २४ : किसन वीर साखर कारखान्याच्या बॉयलर प्रदीपन कार्यक्रमात राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री तथा कारखान्याचे अध्यक्ष मकरंद पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दानुसार मंगळवारपासून (ता. २७) किसन वीर व खंडाळा कारखान्यांच्या सभासद व बिगर सभासदांना साखरेचे वाटप करण्यात येणार आहे. जवळपास आठ वर्षांपासून बंद पडलेली साखर वाटपाची सुरुवात करून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली असल्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.
प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे, की किसन वीर व खंडाळा कारखान्यांच्या सभासद व बिगर सभासदांना अनुक्रमे ज्या सभासदांचा ऊस आलेला आहे त्यांना १० किलो व ज्यांचा ऊस आलेला नाही अशा सभासदांना पाच किलो साखर देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्या बिगर सभासदांचा ऊस गळितासाठी आलेला आहे, त्यांना पाच किलो साखर मिळणार आहे. या साखरेचा दर २० रुपये प्रतिकिलो राहणार आहे. साखर घेण्यासाठी येताना सभासदांनी कारखान्याने दिलेले स्मार्टकार्ड किंवा आधारकार्ड व त्याची झेरॉक्स आणणे गरजेचे आहे, त्याशिवाय साखर मिळणार नाही, असेही सांगण्यात आलेले आहे.
साखर वाटपाची वेळ सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यत संबंधित गट ऑफिसला करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या गट ऑफिस किंवा शेती कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून आपली साखर कोणत्या ठिकाणी वितरित केली जाणार आहे, याची माहिती घ्यावी. सभासदांना साखर घेण्यासाठी त्रास होणार नाही, याची काळजी व्यवस्थापनाने घेतलेली असून, आपल्या जवळच्या ठिकाणीच साखर वाटपाचे नियोजन केले असल्याचे सांगितले.

---------------------------

Andhra Politics: भाचीच्या लग्नात मामाचाच खोडा; चंद्राबाबू नायडू कोणाला म्हणाले ‘कंसमामा’?

''पाकिस्तान आमचं संरक्षण करतोय, भारताकडून आता अपेक्षा नाही'', माजी मुख्यमंत्र्याच्या विधानानं खळबळ

Gold Jewellery Price: लग्नासाठी सोनं आत्ताच खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी? सोन्याचा भाव 1 लाखांपर्यंत येणार?

ड्रायव्हिंग लायसन्स काढणं होणार कठीण! ऑनलाइन परीक्षेत आता ७५% गुणांची अट, केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

VIRAT KOHLI: विराट कोहलीचा सराव सुरू, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेचा थरार कधी रंगणार? जाणून घ्या ५ सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT