पुणे

हेड साखरेचे दर साठेबाजीमुळे वाढले

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.२४ ः ‘‘ देशात साखरेचे पुरेसे साठे असून कमी उत्पादन आणि साठेबाजीमुळे मागील काळामध्ये दर वाढले आहेत,’’ असे ‘इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर असोसिएशन’कडून (इस्मा) सोमवारी सांगण्यात आले. ‘‘आगामी काळामध्ये साखरेचे दर कमी होतील,’’ असा विश्वास ‘इस्मा’चे अध्यक्ष नीरज शिरगावकर यांनी व्यक्त केला आहे.
हवामानाशी संबंधित समस्यांमुळे यंदा साखरेचे उत्पादन कमी झाले आहे. शिवाय साठेबाजी झाल्यामुळे दरात वाढ झाली आहे. वास्तविक देशात साखरेचे पुरेसे साठे असून सणासुदीच्या काळासाठी आवश्यक तितकी साखर उपलब्ध असल्याचे शिरगावकर यांनी नमूद केले. मागील महिनाभरात साखरेचे प्रति किलोचे दर २४ टक्क्यांनी वाढून साठ रुपयांवर गेले आहेत. वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने १० लाख टन करमुक्त साखरेच्या आयातीचा निर्णय घेतला होता.


साखरेची उपलब्धता वाढणार
सहकारी साखर महासंघाने २०२५-२६ या वर्षात २७९ लाख टन इतके साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. इथेनॉल निर्मितीसाठी वळविण्यात आलेल्या २४ लाख टनांचा यामध्ये समावेश नाही, अशी माहिती महासंघाचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली. साखरेच्या नव्या हंगामाची सुरुवात १ ऑक्टोबर रोजी होईल. खुले साठे ३५ लाख टनापर्यंत जाऊ शकतात. देशाची दर महिन्याची साखरेची गरज २२ लाख टन इतकी आहे. कारखाने लवकर सुरू झाले तर साखरेची उपलब्धता बऱ्यापैकी वाढेल. त्यामुळे घाबरून जाण्याचे काही कारण नसल्याचे नाईकनवरे म्हणाले.


‘थायलंडमधून पुरवठा अशक्य’
‘‘केंद्राने दहा लाख टन साखरेच्या आयातीचा निर्णय घेतला असला तरी ब्राझील वगळता अन्य कोणताही देश मोठ्या प्रमाणात निर्यात करण्याच्या स्थितीत नाही. थायलंडमध्ये साखरेची कमतरता असल्याने तेथून साखर येण्याची शक्यता कमी आहे. ब्राझीलची साखर भारतात पोहोचण्यासाठी ४० ते ४५ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे १५ ऑक्टोबरपूर्वी नेमकी किती साखर परदेशातून देशात येईल, याचा अंदाज लावणे कठीण आहे,’’ असेही नाईकनवरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price Today: सोन्याच्या भावात 5 दिवसांत मोठी घसरण! उच्चांकापासून तब्बल 33 हजारांनी स्वस्त; दसऱ्याआधी पाहा ताजा भाव

Distance Education: राज्यात दूरस्थ शिक्षण घेणारे वाढले ;केंद्रीय उच्चशिक्षण विभागाचा अहवाल

Train Viral Video : वा रे पठ्ठ्या ! थेट ट्रेनच्या एसी डब्यातच थाटले पानाचे दुकान, अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

स्मृती मानधनाचा कर्णधार म्हणून आज पहिला सामना! दुसरीकडे भारताच्या स्टार महिला क्रिकेटपटूची अचानक निवृत्ती...

Marathi News Live Updates: तिरंगा फडकवण्याच्या आवाहनानंतर दिल्लीतील टॉलस्टॉय मार्ग परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

SCROLL FOR NEXT