Pune Lok Sabha 2024 
पुणे

Pune Lok Sabha 2024: ...तर पुणे लोकसभा निवडणूक लढवणार; सुनील देवधर यांची मोठी घोषणा

भाजप नेते सुनील देवधर यांनी पुण्यात भेटीगाठी वाढवल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचे नाव चर्चेत आहे.

Sandip Kapde

Pune Lok Sabha 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजपे दिल्लीत सर्व राज्यातील प्रमुख अध्यक्षांची बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या विजयासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पंचसूत्रांचा उपयोग करावा, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. 

दरम्यान भाजप नेत्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. पक्षाने संधी दिल्यास पुणे लोकसभा निवडणूक लढवणार, अशी घोषणा भाजप नेते सुवील देवधर यांनी केली आहे. पुणे लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे देवधर म्हणाले.

भाजप नेते सुनील देवधर यांनी पुण्यात भेटीगाठी वाढवल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचे नाव चर्चेत आहे. दरम्यान त्यांनी आज पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे म्हटले आहे.

सुनिल देवधर म्हणाले,  नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने पंतप्रधान बनतील ही आम्हा सर्वांना खात्री आहे.

पुण्यात राहून देशाचं राजकारण करायचं का? यावर सुनिल देवधर म्हणाले, एक गोष्टी नक्की आहे पक्षाने संधी दिली तर आम्ही पक्षासाठी काहीही करायला तयार असतो. जनतेचं राजकारण करायला मला आवडेल. लोकसभेसाठी संधी दिली तर मी नाही म्हणणार नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanar Bauxite Project : 'कोकणच्या लाल मातीवर अन्याय होऊ देणार नाही!' नाणार बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी होणार रद्द; विरोधानंतर उदय सामंत यांची मोठी ग्वाही

Kagal NH48 Bridge : कागलकरांचं स्वप्न होणार पूर्ण! 295 कोटींचा 50 पिलरचा भव्य उड्डाणपूल; देशातील सर्वात सुंदर पूल साकारणार, मंत्री मुश्रीफ यांची पायाभरणीवेळी ग्वाही

Koyna Dam Water Storage 100 TMC : 'कृष्णा'काठी जलसंकट टळले! 'कोयने'त 100, तर 'चांदोली'त 34 टीएमसी साठा; शेतीसाठी पुरेसे पाणी

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

SCROLL FOR NEXT