sunny-deol-news.jpg 
पुणे

Vidhan Sabha 2019 : हडपसर मतदार संघात 'स्टारवॉर'; सनी देओल प्रचाराच्या मैदानात

सकाळ वृत्तसेवा

Vidhan Sabha 2019 : पुणे :  राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हेच्या रॅलीला उत्तर देण्यासाठी भाजपच्यावतीने बॉलिवूड अभिनेते, खासदार सनी देओल यांचा 'रोड शो' काल(मंगळवारी) झाला. विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. पुण्यातील प्रचारामध्ये आता एक प्रकारची चुरस पहायला मिळत आहे. 

हडपसर मतदार संघात भाजपचे योगेश टिळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे आणि मनसेचे वसंत मोरे यांच्यात तिरंगी लढत आहे. या मतदार संघात भाजपचे योगेश टिळेकर यांच्या प्रचारासाठी सनी देओल मैदानात उतरले आहेत. मतदार संघात त्यांची काल रॅली आयोजित करण्यात आली होती. 

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने अभिनेते, खासदार डॉ अमोल कोल्हे यांना प्रचारासाठी मैदानात उतरवले होते. हडपसर मतदार संघातील अनेक प्रभागात त्यांची रॅली काढण्यात आली होती.त्याला प्रतिसादही चांगला मिळाला होता. मनसेचे उमेदवार वसंत मोरे यांच्या प्रचारासाठी सोमवारी राज ठाकरे यांची सभा पार पडली तर, भाजपने आज सनी देओलला मैदानात उतरवले. एकूण काय तर या मतदार संघात 'स्टारवॉर' पहायला मिळत आहे..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT