पीवायसी क्लब ः पीवायसी स्नूकर ॲण्ड बिलियर्ड्स लीगमध्ये विजेतेपद संपादिणाऱ्या सुप्रीम एसेस संघाचे खेळाडू आनंद व्यक्त करताना.
सुप्रीम एसेस संघ सलग दुसऱ्या वर्षीही विजेता
पुणे, ता. २४ ः पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित तिसऱ्या पीवायसी स्नूकर अँड बिलियर्डस लीगच्या अंतिम लढतीत गतविजेत्या सुप्रीम एसेस संघाने स्कायलाइन स्ट्रायकर्स संघाचा ४-३ असा पराभव करून सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद मिळविले.
पीवायसी क्लबच्या स्नूकर व बिलियर्डस हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत सुप्रिम एसेस संघाने चुरशीच्या लढतीत स्कायलाईन स्ट्रायकर्स संघाचा ४-३ असा पराभव केला. त्यात महत्त्वाचा वाटा निमिष कुलकर्णी, रोहित सुगंधी, श्री शिरोडकर, प्रकाश वाळंबेने केलेल्या सुरेख खेळाचा होता.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक देण्यात आले. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी पीवायसी क्लबचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, क्लबच्या स्नूकर ॲण्ड बिलियर्डस विभागाचे सचिव नंदन डोंगरे, आमोद प्रधान, शिरीष साठे, रणजीत पांडे, परंपरा बिर्याणीचे संचालक गुरू चिल्लाळ हे उपस्थित होते.
निकाल :
अंतिम फेरी : सुप्रीम एसेस संघ विजयी विरुद्ध स्कायलाइन स्ट्रायकर्स संघ ४-३.
१५ रेड स्नूकर एकेरी : निमिष कुलकर्णी वि.वि. स्वरूप कुलकर्णी ८०-६४; ६ रेड दुहेरी : अशोक शेट्टी व अरुण बर्वे पराभूत विरुद्ध आनंद आपटे व अनिकेत शिंदे २९-५३; बिलियर्ड्स : रोहित सुगंधी वि.वि. अमित भडभडे १००-९७; ६ रेड स्नूकर एकेरी : कर्णा मेहता पराभूत विरुद्ध आदित्य देशपांडे २४-४३; ६ रेड स्नूकर दुहेरी : हर्षद शहा व नकुल पटेल पराभूत विरुद्ध दिव्यांशु गोरे व विशाल भुरट २३-४२; ब्लॅक बॉल शूट आउट : श्री शिरोडकर वि.वि. संजीव आगाशे ३-२; ब्लू बॉल शूट आउट : प्रकाश वाळंबे वि.वि. आरीन माळी २-०.
----------
सर्वोत्तम कामगिरी ः
मोस्ट व्हर्स्टाइल खेळाडू : विशाल मल्होत्रा
मोस्ट प्रॉमिसिंग खेळाडू : रोहित सुगंधी
मोस्ट आउटस्टँडिंग परफॉर्मर : आदित्य देशपांडे
हायेस्ट ब्रेक बिलियर्ड्स’ आणि बेस्ट बिलियर्ड्स खेळाडू : राजवर्धन जोशी
हायेस्ट ब्रेक स्नूकर आणि बेस्ट स्नूकर खेळाडू : निमिष कुलकर्णी
बेस्ट वरिष्ठ खेळाडू : अरुण बर्वे
सर्वोत्कृष्ट दुहेरी खेळाडू : गुरू चिल्लाळ व शक्ती चितळे
बेस्ट ब्लू बॉल खेळाडू : प्रकाश वाळंबे
बेस्ट ब्लॅक बॉल खेळाडू : यश शहा
प्लेअर ऑफ द टूर्नामेंट : आनंद आपटे
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.