पुणे

.

CD

लोगो : सकाळ अंतरंग
.......

प्रलंबित खटल्यांसाठी
‘सर्वोच्च’ विशेष यंत्रणा

इंट्रो
सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यांचा डोंगर कमी करण्यासाठी सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. न्यायालयात अनेक दशकांपासून प्रलंबित असलेले दिवाणी आणि फौजदारी खटले निकाली काढण्यासाठी चार विशेष पीठांची स्थापना करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा प्रयत्न वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा देणारा ठरण्याची शक्यता आहे.
.....

अशी असेल जबाबदारी

दिवाणी खटले : न्या. पी. के. मिश्रा आणि न्या. एस. व्ही. एन. भट्टी यांच्या नेतृत्वाखालील दोन न्यायाधीशांची दोन स्वतंत्र पीठे केवळ सर्वांत जुन्या दिवाणी खटल्यांची सुनावणी करतील.

फौजदारी खटले : न्या. मनोज मिश्रा आणि न्या. उज्ज्वल भुयान यांच्या नेतृत्वाखालील दोन पीठे केवळ जुन्या फौजदारी खटल्यांवर लक्ष केंद्रित करतील.
....

कामकाजाचे दिवस

विशेष यंत्रणा मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या दिवशी काम करील. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार, सोमवार आणि शुक्रवार हे दिवस नवीन याचिका आणि प्राथमिक सुनावणीसाठी राखीव असतात, तर आठवड्याचा मध्यभाग हा सविस्तर आणि दीर्घ युक्तिवादासाठी निश्चित केलेला असतो. या चार पीठांना नियमित सुनावणीच्या यंत्रणेतून मुक्त केल्यामुळे त्यांना जुन्या प्रकरणांवर पूर्ण लक्ष केंद्रित करता येईल.

भूतकाळातील प्रयत्न

-माजी सरन्यायाधीश यू. यू. ललित यांनी नवीन आणि जुन्या खटल्यांसाठी स्वतंत्र वेळ निश्चित केली.
-माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून ‘ज्युडीकेअर’ हा प्रकल्प सुरू केला. या माध्यमातून एकाच कायदेशीर मुद्द्यावर आधारित खटले एकत्र करून ते निकाली काढण्यात आले.
-माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी अनावश्यक व कालबाह्य ठरलेले हजारो खटले पद्धतशीरपणे बाजूला केले.
- नोव्हेंबर २०२५ च्या अखेरीस पदभार स्वीकारताना सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी प्रलंबित खटले कमी करणे प्राथमिकता असेल, असे सांगितले होते. त्यानुसार चार विशेष पीठ स्थापन करण्यात आली आहेत.

आकडे बोलतात...

९६,०४५
एकूण प्रलंबित खटले

७४,२४४
दिवाणी खटले

२१,८०१
फौजदारी खटले

२६ खटले
३० वर्षांपेक्षा जुने खटले

५३२ खटले
२० ते ३० वर्षे जुने खटले

७५,४०२ खटले
२०२५ मध्ये दाखल खटले
(ई-फायलिंग आणि ‘ऑनलाइन’मुळे वाढलेली संख्या)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kudankulam Data Leak: देशाच्या अणुसुरक्षेला मोठा धोका? भारताच्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाचा डेटा लीक; कुडनकुलम प्रकरण नेमकं काय आहे?

IPL 2027: नवा कॅप्टन ते हार्दिक पांड्याचे ट्रेड... Mumbai Indians ची मोठे निर्णय घेण्यासाठी इंग्लंडमध्ये मिटिंग

Fine Arts BFA Admission: कला शिक्षणाच्या प्रवेश नोंदणीस रविवारपर्यंत मुदतवाढ; अभ्यासक्रमासाठी १ हजार ३७९ विद्यार्थ्यांची नोंदणी

‘कॅन वी अटेंड युअर वेडिंग?’ म्हणत भूषण प्रधान- सायली पाटील पोहोचले चाहत्यांच्या लग्नात; व्हिडिओ व्हायरल!

Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रवासाचा खर्च किती होणार? तिकीट दर विमानांपेक्षा किती स्वस्त असणार, जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT