लोगो
सुशील थोरात हल्ला प्रकरण
...
फोटो - PNE26W43999
अहिल्यानगर ः पत्रकार सुशील थोरात यांच्यावर हल्ल्यातील आरोपींवर कारवाईच्या मागणीचे निवेदन पोलिसांना देताना अहिल्यानगर शहरातील पत्रकार.
सोनू कोहकसह सहा जणांवर गुन्हा
पत्रकार संघटनेकडून निवेदन; कठोर कारवाईची मागणी
अहिल्यानगर, ता. २१ ः साम टी.व्ही.चे पत्रकार सुशील थोरात यांच्यावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी सोनू कोहकसह सहा आरोपींच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पत्रकार संघटनेकडून निषेध व्यक्त करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन पोलसांना देण्यात आले.
पत्रकार थोरात व त्यांचा मुलगा सार्थक यांना मारहाण करतानाच सोनू कोहक याने पाइपलाइन रस्त्यावरील एचडीएफसी बँकेजवळ इतरांना बोलविले. थोरात बँकेजवळ पोहोचले असता, पप्पू मते, विकी ढवण यांनी दोघांनाही मारहाण केली. लोकांची गर्दी जमा होत असल्याचे पाहून सर्व आरोपी पळून गेले. थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक कल्पना चव्हाण पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पत्रकारांकडून निषेध व्यक्त करण्यात आला. संबंधित आरोपींना अटक करून कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने पोलिसांना देण्यात आले. दरम्यान, ॲड. सुरेश लगड यांनी या प्रकरणाचा निषेध केला. वकिलांच्या वतीने गुंडगिरीविरोधात पोलिसांना निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
इन्फो
...
‘सकाळ’ टीमकडून दिलासा
‘सकाळ’चे मुख्य संपादक नीलेश खरे यांनी थोरात यांना दूरध्वनीवरून दिलासा दिला. संबंधित गुंडांवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडे पाठपुरावा करू, असे त्यांनी सांगितले. यावेळी ‘सकाळ’चे सहसंपादक प्रकाश पाटील व कार्यालयातील टीम, तसेच शहरातील विविध माध्यमांचे प्रतिनिधी रुग्णालयात उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.