Swasthyam 2022 Pedestrian Day will be celebrated at 21 places pune Municipal Corporation sakal
पुणे

Swasthyam 2022 : पुणेकरांनो, चला चालूयात...

येत्या रविवारी पादचारी दिवस : महापालिकेकडून तयारीला वेग

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पादचाऱ्यांना चालण्यासाठी मोकळा मार्ग मिळतच नाही. पादचाऱ्यांना सुविधा देता याव्यात, त्याबद्दल जनजागृतीसाठी महापालिकेने गेल्यावर्षी ११ डिसेंबरला ‘पादचारी दिन’ साजरा केला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. यंदा लक्ष्मी रस्त्यावर उंबऱ्या गणपती ते गरुड गणपती हा ५०० मीटर रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवून पादचाऱ्यांसाठी खुला असणार आहे. यासह शहरात २१ ठिकाणी पादचारी दिन साजरा केला जाणार आहे.

या संदर्भात लक्ष्मी रस्त्यावरील व्यापाऱ्यांनाही कळविले असून पर्यायी मार्गावरून वाहतूक वळविण्यासाठी पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी वाहतूक पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांना पत्र पाठवले आहे.

या मार्गांवर आयोजन

  • लक्ष्मी रस्ता (उंबऱ्या गणपती ते गरुड गणपती)

  • लाल बहादूर शास्त्री रस्ता

  • बिबवेवाडी रस्ता (रम्यनगरी ते पुष्पमंगल कार्यालय)

  • सहकारनगर रस्ता (गजानन महाराज मठ ते पंचमी हॉटेल)

  • वानवडी (जगताप चौक ते जांभूळकर चौक)

  • लुल्लानगर ते गंगाधाम चौक

  • हडपसर-महंमदवाडी रस्ता (रहेजा सर्कल ते विबग्योर स्कूल)

  • सासवड रस्ता (गाडीतळ ते गोंधळेनगर)

  • जंगली महाराज रस्ता

  • पाषाण-सूस रस्ता

  • मयूर कॉलनी, सिटी प्राइड थिएटर कोथरूड

  • कर्वे रस्ता (शेलारमामा चौक ते सावरकर स्मारक, पौड फाटा ते डहाणूकर कॉलनी)

  • खराडी दक्षिण मुख्य रस्ता

  • ५०९ चौक ते विश्रांतवाडी आणि बॉम्बे सॅपर्स ते विश्रांतवाडी

रस्त्यावर असणारी गर्दी, दोन्ही बाजूला लावलेल्या गाड्यांमुळे नागरिकांना चालता येत नाही. मात्र, असे उपक्रम राबवून पिण्याचे पाणी, बसण्यासाठी जागा, चांगले पादचारी मार्ग अशा सुविधा दिल्यास त्यास प्रतिसाद मिळेल. शिवाय असे उपक्रम महिन्यातील काही दिवस एका ठराविक वेळेत राबविले पाहिजेत.

- सारंग कुलकर्णी, नागरिक

उपक्रमाचा हेतू काय?

पादचाऱ्यांना मुक्तपणे संचार करता यावा

वाहनांमुळे होणारी कोंडी, प्रदूषण कमी व्हावे

पादचारी मार्ग, सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग यासह इतर पूरक सुविधा पुरविणे

वाहनांपेक्षा पादचाऱ्यांना प्राधान्य दिले जाते हा संदेश पोचवणे

लहान मुलांमध्ये याबाबत विचार रुजविणे

बाजारपेठेत चालत जाऊन खरेदीसाठीची मानसिकता निर्माण होणे

उपक्रमाबाबत

वर्ष ः दुसरे

कधी ः ११ डिसेंबर

कुठे ः शहरात २१ ठिकाणी

केव्हा ः सकाळी ११ ते दुपारी चार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT