School Closed in Due to Corona  sakal
पुणे

Pune : नगररोड भागात लहान मुलांमध्ये कोरोनाचे सौम्य लक्षणे

सर्दी खोकला ताप घशात खवखवणे असे कोणतेही लक्षणे दिसल्यास पालकांनी डॉक्टरांकडे वेळेत मुलांची तपासणी करून घ्यावी

सकाळ वृत्तसेवा

रामवाडी : नगररोड भागात विमाननगर -सोमनाथनगर ,खराडी- चंदननगर ,वडगावशेरी-कल्याणीनगर, आणि लोहगाव या चार ही प्रभागात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यामध्ये 1 ते 15 वयोगटातील मुलांमध्ये कोरोना होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेले अकरा दिवसांत 450 पर्यत संख्या पोहचली आहे. सर्दी खोकला ताप घशात खवखवणे असे कोणतेही लक्षणे दिसल्यास पालकांनी डॉक्टरांकडे वेळेत मुलांची तपासणी करून घ्यावी असे आवाहन नगररोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त सुहास जगताप यांनी केले आहे.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलां च्या आरोग्याच्या दृष्टीने शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मुलांचे ठराविक वेळे पर्यंत ऑनलाईन अभ्यास सुरू असतो ते संपल्या नंतर मुले एकत्रित येऊन क्रिकेट, फुटबॉल , बास्केट बॉल खेळणे,सर्वजण एकत्रित येऊन गप्पा मारणे हा प्रकार सुरू आहे.अशा वेळी ना तोंडाला मास्क बांधणे ना सोशल distance चे पालन करणे यामुळे मुलांमध्ये कोरोना वाढत आहे.पालकांमध्ये मुलांच्या आरोग्य विषय बाबत मात्र चिंता वाढलेली दिसुन येत आहे.

सुवर्णा जोगदंड : घरा बाहेर पडताना मुले मास्क बांधुन खाली खेळला येता त पण काही वेळा नंतर तो मास्क मुलांच्या कानावर,हनुवटी वर लोंबकळत असतो तर काही जण तर खिशात ठेवतात त्यामुळे लहान मुलांमध्ये कोरोना वाढत आहे. पालकांनी मास्कचे महत्त्व मुलांना समजावून सांगितले पाहिजे.

नगररोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत -

दिनांक 9 जानेवारी ते 19 या कालावधीत 0 ते 15 वयोगटातील 450 मुलांना कोरोना झाला आहे.डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार सुरू आहेत.सौम्य लक्षणे असल्याने होम आयसोलेशन वर भर दिला जात असल्याचे संबंधित आरोग्य विभागा कडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT