Corona-Danger 
पुणे

Coronavirus : तळेगाव दाभाडे गुरुवारपासून दोन दिवस पुर्ण लाॅकडाऊन

सकाळवृत्तसेवा

तळेगाव स्टेशन - कोरोनाच्या दिवसेंदिवस वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून तळेगाव दाभाडे शहर गुरुवार (ता.०९) पासून दोन दिवस पुर्णतः लाॅकडाऊन केले जाणार आहे. गुरुवार आणि शुक्रवार ९ आणि १० एप्रिल असे दोन दिवस २४ तास तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत संचारावर बंदी घालण्यात आली आहे. सकाळी आठ ते दहा असे दोन तास केवळ दुध वितरणास मुभा देण्यात आली आहे.

दवाखाने, मेडीकल आदी अत्यावश्यक वैदयकीय सेवा वगळता शहर हद्दीत भाजीपाला, किराणा, गॅस, बेकरी तसेच इतर सर्व दुकाने पुर्णपणे बंद राहतील. दरम्यान नागरिकांनी बिल्कुल घराबाहेर पडू नये, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दिपक झिंजाड यांनी केले. या दोन दिवसांमध्ये सफाई, आरोग्य, गॅस वितरण, किराणा, मेडीकल आणि आपत्कालीन सेवेतील इतर व्यावसायिकांची कोरोनाविषयक वैदयकीय तपासणी केली जाणार आहे. निरोगी लोकांनाच दोन दिवसांनंतर सेवा देण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे असे झिंजाड यांनी स्पष्ट केले.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाकडे पाहता प्रत्येकाने जबाबदारीने वागायला हवे.घरातून बाहेर पडूच नये. अपरिहार्य आणि अत्यावश्यक असल्यास पोलिसांना कळवावे जेणेकरुन घरीच मदत उपलब्ध करता येऊ शकेल असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी केले आहे. लाॅकडाऊनदरम्यान विनाकारण मोकाट फिरणार्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा वाघमोडे यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe Video: ''..त्यांनी माझा इतिहास बघावा, मग धमकी देण्याच्या भानगडीत पडावं'', तुकाराम मुंढेंचा इशारा; व्हिडीओ व्हायरल

Pali News : छायाचित्रणाचा आनंद घ्या, पण ड्रोन उडवून पक्ष्यांचा जीव धोक्यात घालू नका; शंतनू कुवेस्कर यांचा डॉक्युमेंट्रीतून संवर्धनाचा संदेश

Viral Video: जिच्यासाठी उंदीर आणला तिनेच धोका दिला! आपल्या मांजरीला दुसऱ्यासोबत पाहून तुटलं बोक्याचं हृदय; पुढे...

BAN vs AUS 2nd ODI : बांगलादेशने इतिहास रचला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली वन डे मालिका; वर्ल्ड कप विजेत्यांना अक्षरशः रडवले

Latest Marathi News Live Update: गंगापूर धरणात बुडून चार मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT