तळेगाव ढमढेरे, ता. १८ : तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले उपबाजारात सोमवारी (ता.१८) शेळी, बोकड व मेंढीस मोठी मागणी होती. चांगला बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
बकरी ईदमुळे बोकड व शेळी- मेंढीची मोठ्या प्रमाणात आवक झाली असल्याचे प्रशासक हरिश्चंद्र कांबळे, सचिव अनिल ढोकले व सहायक सचिव अनिल ढमढेरे यांनी सांगितले. साधारण ३०० ते ३५० बोकडांची व १५०० पेक्षा जास्त शेळी व मेंढीची विक्री झाली आहे.
बोकडाला १५ हजार ते ५०००० हजार रुपये व शेळीला साधारण ९ हजार ते २५००० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला आहे. मेंढीला ५ हजार रुपये पासून ९००० हजार रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला आहे.
बाजारात अहिल्यानगर, नाशिक, रायगड, सातारा, बीड आणि पुणे जिल्हा या विविध भागातून शेतकरी व पशुपालकांनी शेळी - मेंढी विक्रीसाठी आणली होती. राज्यभरातून व्यापारी व किरकोळ खरेदीदार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.