पुणे

तांबडेमळ्यातील रस्ता अखेर खुला

CD

मंचर, ता.१९ : तांबडेमळा (ता. आंबेगाव) येथील चिमणवाडीकडे जाणारा महत्त्वाचा संपर्क रस्ता काही व्यक्तींनी रविवारी (ता.१७) जाणीवपूर्वक बंद केला. याबाबत ‘सकाळ’मध्ये ‘रस्ता अडवल्याने तुटला ३०० कुटुंबांचा संपर्क’ हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महसूल व पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई केली व मंगळवारी (ता.१९) दुपारी रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.

रस्ता पुन्हा सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. विशेषतः दूध व्यवसाय करणारे, टेम्पोमधून रोजंदारीसाठी जाणाऱ्या महिला तसेच शेतकरी वर्गाने मोठा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली. प्रशासनाच्या तत्पर कारवाईबद्दल तसेच दिलीप वळसे पाटील यांच्या पाठपुराव्याबद्दल ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यामुळे परिसरातील सुमारे ३०० कुटुंबांचा संपर्क तुटला होता. या घटनेमुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असून दूध व्यवसाय, शेतमाल वाहतूक तसेच रोजंदारीसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या.

दरम्यान, रस्ता बंद झाल्यानंतर तांबडेमळाच्या सरपंच प्राजक्ता तांबडे यांनी तातडीने राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.

घटनेची गांभीर्याने दखल घेत दिलीप वळसे पाटील यांनी तात्काळ प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर आंबेगावचे तहसीलदार तथा दंडाधिकारी डॉ. सचिन वाघ, पोलिस उपनिरीक्षक सनेल धनवे तसेच पोलिस कर्मचारी तुषार अर्जुन यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली व रस्ता खुला केला.

सार्वजनिक वाहतुकीचा रस्ता बंद करणे कायद्याने गुन्हा आहे. याबाबत मंचर पोलिसांना चौकशी करण्याविषयी व संबंधित दोषी असणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- डॉ. सचिन वाघ,
तहसीलदार तथा दंडाधिकारी आंबेगाव तालुका.

15820

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

Pune Crime : अल्पवयीन नातीवर लैंगिक अत्याचार; आजोबाला जन्मठेप

Mumbai Metro Viral News: मुंबई मेट्रोत मांजरीला लागली 'नोकरी'! MMMOCL ने दिलं Chief Feline Officer पद, ड्युटीही ठरवली

Hospital Fire Audit : आरोग्य विभागाचे वरातीमागून घोडे; अमरावती दुर्घटनेनंतर राज्यातील रुग्णालयांचे फायर ऑडिट

Marathi News Updates : राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT