Teacher 
पुणे

#शिक्षकदिन : पवित्र प्रणालीतून १९३ शिक्षक

ज्ञानेश्वर बिजले

पिंपरी - महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये अडीचशे शिक्षकांची कमतरता असून, त्यापैकी १९३ शिक्षक सेवक राज्य सरकारच्या पवित्र प्रणालीच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे वीस टक्के शिक्षक कमी असल्याने शिक्षणावर परिणाम होत असून उर्दू, हिंदी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षक संख्या मान्यतेच्या तुलनेत खूपच कमी आहे. 

राज्य सरकारने शिक्षक सेवक भरतीसाठी पवित्र प्रणाली सुरू केली. जिल्हा परिषद किंवा अन्य महापालिकांच्या शिक्षकांनी बदलीसाठी प्रयत्न केल्याचे समजते. मात्र, त्यांना पालिकेत सामावून घेण्याऐवजी राज्य सरकारच्या माध्यमातून शिक्षक सेवकांची भरती करण्याकडे पालिकेच्या सत्ताधारी पक्षाचा कल आहे.  

शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जुलैमध्ये विधिमंडळ अधिवेशनामध्ये पवित्र प्रणालीच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्याचे जाहीर केले. ऑनलाइन पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. २००५ पासून शिक्षक भरती बंद असल्याने निवृत्त होणाऱ्या शिक्षकांच्या रिक्त जागा भरलेल्या नाहीत. महापालिकेच्या हिंदी माध्यमाच्या दोन शाळांसाठी शिक्षकाच्या ३५ जागांपैकी केवळ दहाच जागा भरल्या. उर्दू माध्यमाच्या मान्य १३१ जागांपैकी ८८ जागी शिक्षक आहेत. त्यामुळे या माध्यमांचे विषय शिकविण्यासाठी मराठी माध्यमाच्या शिक्षकांवर जबाबदारी सोपविली आहे.

मराठी माध्यमाच्या शिक्षकांसाठी पवित्र प्रणालीच्या माध्यमातून शिक्षक सेवकांची भरती केली जाईल. उर्दू व हिंदी माध्यमांच्या शाळांसाठी अन्य जिल्ह्यांतील जादा शिक्षक समायोजन पद्धतीने देण्याची मागणी राज्य सरकारकडे गेल्या महिन्यात केली. 
-  ज्योत्स्ना शिंदे, प्रशासन अधिकारी, महापालिका शिक्षण मंडळ

पवित्र प्रणालीद्वारे पारदर्शक पद्धतीने शिक्षक सेवकांची भरती होईल. त्यामुळे त्याच पद्धतीने भरती करण्याचा निर्णय आमदार लक्ष्मण जगताप, शिक्षण समितीच्या सभापती प्रा. सोनाली गव्हाणे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत घेतला. 
- एकनाथ पवार, सत्तारूढ पक्षनेते, महापालिका 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT