Pune Terrorist Sakal
पुणे

Pune Terrorist : पुण्यात पोलिसांनी दहशतवाद्यांना केलं जेरबंद: पहाटेचा तो थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

पहाटे चार ते साडेचारच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुण्यात राहून दहशतवादी कारवाया करण्याचा कट असलेल्या तीन दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी जेरबंद केलं आहे. पहाटे चार ते साडेचारच्या दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तर या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये पोलिस अधिकाऱ्याने दहशतवाद्याला पकडून ठेवल्याचं दिसत आहे.

अधिक माहितीनुसार, १८ जुलैच्या पहाटे कोथरूड पोलिसांनी दहशतवाद्यांना पकडतानाचा हा थरारक सीसीटीव्ही आहे. कोथरूडमध्ये पकडलेले तीन दहशतवादी पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी आणि शाहनवाज असं या तीन दहशतवाद्यांचं नाव असून हे तिघेही पोलिसांच्या ताब्यात होते.

सीसीटीव्ही मध्ये असणारा दहशतवादी हा मोहम्मद युनूस साकी असून त्याने पोलिसांना गुंगारा देत पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, बाला रफिक शेख या पोलिस अधिकाऱ्याने साकिला पकडून ठेवले. १८ जुलैला झालेल्या कारवाईचे सीसीटीव्ही फुटेज आत्ता समोर आले आहेत.

दरम्यान, पुण्यातील कोंढवा आणि खडकी परिसरात याआधी दहशतवादी कारवाया करणाऱ्या आणि बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या तयारीत असणाऱ्या अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातून अनेकदा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बॉम्बस्फोटाची चाचणी करण्याचे प्रशिक्षण

याआधी अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुण्याजवळ असलेल्या दिवे घाटामध्ये दहशतवाद्यांकडून बॉम्बस्फोटाची चाचणी करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती एनआयएच्या तपासातून समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT