ssc hsc board 
पुणे

15 जुलैच्या आसपास दहावीचा निकाल लागणार; बोर्डाची माहिती

सागर आव्हाड

पुणे : ''महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने दहावीच्या परीक्षा रद्द केली असून १ मेला त्याबाबतचा शासनाचा निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. दरम्यान, मूल्यमापन तपशीलवार निकाल कसा लावायचा याबाबत परिपत्रक काढण्यात आले आहे. दरम्यान, १५ जुलैच्या आसपास दहावीचा निकाल लागणार असून ऑनलाइन निकाल बघण्याची व्यवस्था देखील केली जाणार आहे'' अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी माहिती दिली आहे.

दरम्यान, ''मूल्यमापन कसं करायचं, प्रत्यक्ष कार्यपद्धती आणि त्याचे स्वरूप कसं असेल याचे प्रशिक्षण देण्याचे काम शैक्षणिक संस्थांनी सुरू केलं आहे. तसेच मूल्यमापन करण्यासाठी शिक्षण मंडळाला स्वतंत्र संगणक प्रणाली बनवली आहे. जे निकाल समितीने प्रामाणित केले ते गुण शाळांना भरायचे आहेत. यावर्षीचा निकाल ९ वी आणि १० वीचे गुण शाळांनी भरायचे आहे, त्यानंतर त्यावर विभागीय आणि क्षेत्रिय अधिकारी काम करतील. निकाल पारदर्शक असतील आणि त्यात बेबनाव होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. यामध्ये शिक्षकांनी काम चुकीचे काम केल्यास त्यासाठी शिक्षेची तरतुद देखील करण्यात आली आहे.'' असेही अध्यक्ष पाटील यांनी सांगतिले.

''बहिस्त विद्यार्थ्यांची खास सुविधा सुरु केली असून गृहपाठ आणि इतर अभ्यासावर त्यांचा निकाल लावला जाणार आहे. शिक्षकांनी ३ जुलै पर्यंत ही माहिती भरावी अशी सुचना देण्यात आली असून त्यामध्ये काही त्रुटी असल्यास आठ दिवस त्यावर आम्ही काम करू. शाळांनी लवकर गुण भरल्यास आम्हाला लवकर निकाल लावता येईल.'' असेही त्यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT