पुणे

इंगवलीत निवडणूक घेवून निवडला तंटामुक्त समितीचा अध्यक्ष

पाच ग्रामस्थ अध्यक्षपदासाठी इच्छूक होते.

विजय जाधव

भोर : स्वर्गीय दादा कोंडके यांच्या इंगवली (ता.भोर) गावात ग्रामस्थांनी चक्क निवडणूक घेवून तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची निवड केली. निवडणूकीनंतर संभाजी शिवाजी कारभळ हे तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष म्हणून निवडून आले. इंगवली ग्रामपंचायतीची पुर्नरचना झाल्यानंतर झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी एकमत झाले नाही. पाच ग्रामस्थ अध्यक्षपदासाठी इच्छूक होते.

त्यामुळे ग्रामसभेत चक्क निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी (ता.१०) तंटामुक्तीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. सरपंच सारिका बांदल यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. पाच उमेदवारांपैकी तीघांनी माघार घेतल्याने मोहन अनंत किन्हाळे व संभाजी शिवाजी कारभळ यांच्यामध्ये निवडणूक झाली. निवडणूक ही रितसर लोकशाही पध्दतीने घेण्यात आली. गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मतदान प्रकीया पार पडली. निवडणूकीत महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले. गावातील ४९८ मतदारांनी मतदान केले. यामध्ये मोहन किन्हाळे यांना १९२ तर संभाजी कारभळ यांना २८९ मते मिळाली. तर १७ मते बाद झाली.

संभाजी कारभळ हे ९७ मतांनी विजयी झाले. मुख्याध्यापक एन. एस. दलवाई, शिक्षक संदीप जगताप, पोलीस पाटील अमित कांबळे व ग्रामसेवक प्रसाद सोले यांनी निवडणूक प्रक्रियेचे काम पाहिले. तसेच किकवी पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक फौजदार अंकुश खोमणे यांनी निवडणूकीदरम्यान चोख बंदोबस्त ठेवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chadchan Crime Six Killed Land Dispute : महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवर जमिनीच्या वादातून हत्याकांड, सहा जणांची धारधार शस्त्रांनी हल्ल्यानंतर गोळ्या घालून निर्घृण हत्या

Latest Marathi Update Live: विदर्भातील पाचही विधान परिषद जागांसाठी काँग्रेसची जोरदार तयारी

Travels Bike Accident : खासगी ट्रॅव्हल्सची दुचाकीस धडक; चार तरुणांचा जागीच मृत्यू

Sai Sudharsan Hit Wicket: साई सुदर्शनची बॅट पुन्हा स्टम्पवर पडली, शुभमनने डोक्यावर हात मारला; विचित्र विकेटचा Video Viral

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ३० मे २०२६ ते ५ जून २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT