International Film in Piff sakal
पुणे

‘पिफ’मध्ये चित्रपट प्रदर्शनाचा आनंद वेगळाच

महोत्सवात दिग्दर्शक, कलाकारांच्या भावना; संवादाचीही मेजवानी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आपला चित्रपट हा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासारख्या व्यासपीठावर प्रदर्शित होतोय, त्याला प्रेक्षक प्रतिसाद देत आहेत. त्यांना चित्रपट आवडतोय, याचा आनंद हा वेगळाच आहे, अशा भावना आज महोत्सवांतर्गत दाखविण्यात येत असलेल्या आणि विविध विभागात समाविष्ट असलेल्या चित्रपटांच्या दिग्दर्शक, पटकथाकार, अभिनेते व अभिनेत्री यांनी व्यक्त केल्या.

लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे आयोजित ‘कँडिड टॉक्स’ या कार्यक्रमाअंतर्गत पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक समर नखाते यांनी आज टक टक, तेन, गोत, कत्तील आणि फन’रल या चित्रपटांच्या चमुंशी संवाद साधला.

‘टक टक’ चित्रपटाचे पटकथाकार विशाल कुदळे आणि आशिष कलारिया, तेन या तमीळ चित्रपटातील अभिनेत्री अबरनाथी, गोत चित्रपटाचे दिग्दर्शक शैलेंद्र बागडे, निर्मात्या व अभिनेत्री किरण बागडे, कत्तील चित्रपटाचे दिग्दर्शक व अभिनेते ई. व्ही. गणेशबाबू व श्याम, फन’रल चित्रपटाचे दिग्दर्शक विजय दुबे, पटकथाकार रमेश दिघे, अभिनेते आरोह वेलणकर, हर्षद शिंदे व सिद्धेश पुजारे आदी या वेळी उपस्थित होते.

‘तेन’मधील अभिनेत्री अबरनाथी म्हणाल्या, “निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या आदिवासी नागरिकांची अवस्था यामधून दाखविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

‘गोत’ चित्रपटाच्या कथेद्वारे गोंड, कोरकू या आदिवासी जमातींमधील श्रद्धा, दंतकथा, चालीरीती आम्ही दाखविल्या आहेत. आदिवासी जमातीत बोलले जाणारे अनेक शब्द, संकल्पना आज नामशेष होत आहेत.

- शैलेंद्र बगाडे, ‘गोत’चा दिग्दर्शक

एखाद्या घरात मृत्यू झाला तर ते कुटुंब वेगळ्याच मानसिक अवस्थेत असते. अशा वेळी शेजारीपाजारी, नातेवाईक हे पुढे येत त्या व्यक्तीच्या अंतिम प्रवासाची तयारी करतात. हे करीत असताना चाळीतल्या चार तरुणांना एक वेगळाच मार्ग सापडतो. याची कथा ‘फन’रल’ या चित्रपटात पहायला मिळते.

- रमेश दिघे, पटकथाकार व निर्माता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT