Pune Crime News sakal
पुणे

Pune Crime News : कोंढव्यात मद्यपीकडून पत्नीवर ब्लेडने वार

मद्यपीने पत्नीवर ब्लेडने वार केल्याची घटना कोंढवा भागात घडली. या प्रकरणी पतीविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मद्यपीने पत्नीवर ब्लेडने वार केल्याची घटना कोंढवा भागात घडली. या प्रकरणी पतीविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिमा सिसील भोसमाता-गिरी (वय २०, रा. सिद्धार्थनगर, कोंढवा) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

या प्रकरणी पती अनमोल लक्ष्मीकांत गिरी (वय ३४, रा. क्वीन्स गार्डन सोसायटी, कोंढवा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रिमा यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनमोल याला दारू पिण्याचे व्यसन आहे.

दारू पिऊन तो पत्नीला त्रास देत असल्याने गेल्या वर्षभरापासून रिमा पतीपासून वेगळी राहत आहे. रिमा घरकाम करते. ती दुपारी कामावरून घरी निघाली होती. त्यावेळी अनमोलने तिला रस्त्यात अडवून शिवीगाळ केली. तिच्यावर ब्लेडने वार केले. पसार झालेल्या अनमोलचा शोध घेण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मंत्री विखेंनी फडणवीसांचे ऐकून मराठा समाजाचे नुकसान केले; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, अंतरवालीत न येण्याचा इशारा

ST Bus: गणेशोत्सवासाठी लालपरी सज्ज! मुंबई, ठाणे, पालघरहून कोकणात जादा ५,२२० जादा एसटीची धाव

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Pithori Amavasya 2026: १० की ११ सप्टेंबर? पिठोरी अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, पूजेची पद्धत अन् महत्त्व!

Sainik Takli MIDC protest : सैनिक टाकळी एमआयडीसीविरोधात शिरोळमध्ये राडा; प्रशासनाच्या कार्यालयाचे गेट तोडले, काचा फोडल्या, पोलिस कर्मचारी जखमी

SCROLL FOR NEXT