लोणी काळभोर, ता. २४ : घरात महालक्ष्मीची पूजा सुरू असताना देवीच्या मूर्तीवरील सात तोळ्यांचे सोन्याचे गंठण चोरीला गेल्याची घटना रामदरा रोड परिसरात घडली. याप्रकरणी मांजरी येथील एका परिचित महिलेवर संशय व्यक्त करत लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
याबाबत सचिन शिरीष खुने (वय ४२, रा. साई शांती सोसायटी, रामदरा रोड, लोणी काळभोर) यांनी फिर्याद दिली आहे. खुने यांनी २०२४मध्ये पत्नीसाठी ६ तोळे ८ ग्रॅम ७१० मिलीग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण खरेदी केले होते. ४ सप्टेंबरला श्रावणी शुक्रवारनिमित्त देवीच्या मूर्तीला हे दागिने घालून पूजा करण्यात आली होती.
५ सप्टेंबरला सकाळी साडेनऊच्या सुमारास मांजरी येथील ३९ वर्षीय महिला दर्शनासाठी खुने यांच्या घरी आली होती. ती देवघरात दर्शन घेऊन हॉलमध्ये गप्पा मारत बसली होती. दरम्यान, सकाळी साडेअकराच्या सुमारास खुने यांच्या पत्नीची मैत्रीण तेथे आली. त्यानंतर मांजरी येथील महिला पुन्हा देवघरात गेली. दुपारी बाराच्या सुमारास ती महिला निघून गेल्यानंतर, दीडच्या सुमारास खुने यांच्या पत्नीच्या निदर्शनास आले की देवीच्या गळ्यातील गंठण गायब आहे.
खुने यांनी ८ सप्टेंबर रोजी तक्रार अर्ज दिला होता, त्यानंतर १९ ऑक्टोबर रोजी जबाब नोंदविला. याप्रकरणी आता अधिकृत फिर्याद दाखल झाली असून पोलिस हवालदार अण्णा माने पुढील तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.