Theft 
पुणे

भावकीतील लग्नाला जाणे पडले ३.७५ लाखाला

सकाळवृत्तसेवा

वालचंदनगर - रुई (ता. इंदापूर) येथे अज्ञात चोरट्याने भरदिवसा दोन ठिकाणी घरफोड्या सोने-चांदीच्या दागिन्यासह ३ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याप्रकरणी अमोल बापुराव मारकड वय (२६, रा.रुई) यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मारकड यांचे रुई गावामध्ये हॉटेल व्यवसाय आहे. आज गुरुवार (ता. १७) रोजी सकाळी नेहमीप्रमाणे मारकड हे सकाळी सहा वाजता वडिल बापुराव व भाऊ अविनाश यांच्यासह  हॉटेल सुरु करण्यासाठी गेले होते.

दुपारी १२ च्या सुमारा अमोलची पत्नी सुप्रिया व भावजय प्रियंका घरातील मुलांना घराला कुलूप लावून भावकीतील लग्नाला गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी घरावरती नजर ठेवून घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याची अंगठी, चैन, बदाम, कानातील फुले, सोन्याचे घंटन, बोरमाळ असे सव्वा पाच तोळे सोन्याचे, चांदीच्या पट्या व  दाेन हजार रुपये असा ३ लाख ६३ हजार ८० रुपयांचा ऐवज लंपास केला. तसेच अमोल यांच्या घराशेजारील सर्जेराव सुखदेव मारकड यांच्या घराचे कुलूप तोडले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Blood Donation Rules : रक्तदान शिबिरांबाबत आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय!

Manoj Jarange On Farmer Relief : "५ हजारांसाठी शेतकऱ्यांनी बँकेच्या रांगेत मरायचं का?"; मनोज जरांगेंचा सरकारवर थेट हल्लाबोल, म्हणाले...

Latest Marathi News Update: कॅफेबाहेर खुनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या आरोपीला अटक

Social Media Backlash : "व्ह्यूजसाठी इतक्या खालच्या पातळीला..."; पत्नीला पाळीव कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजले, यूट्यूबर सौरभ जोशीवर नेटकरी भडकले!

Jailer 2 Movie Review : रजनीकांतच्या 'जेलर २'चा प्रेक्षकांवर प्रभाव कसा? वाचा रिव्ह्यू

SCROLL FOR NEXT