Three persons including the chairman booked for mutual sale of the Society shop 
पुणे

सोसायटीचे गाळे परस्पर विकल्याप्रकरणी चेअरमनसह तिघांवर गुन्हा 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी: सोसायटीच्या खोट्या पत्राद्वारे वैयक्तिक खात्यावर पैसे घेतले. यासह सोसायटीच्या मालकीचे तीन गाळे सोसायटीला विश्‍वासात न घेता परस्पर विकून फसवणूक केल्याप्रकरणी सोसायटीच्या चेअरमनसह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार वाकड येथे घडला. 

सुदेश सुधाकर राजे (वय 51, रा. बिल्डिंग सी, ड्यु-डेल सोसायटी, दत्त मंदिर रोड, वाकड), शिवदास पंडित कलाटे (वय 36, रा. बेलावेस्टा सोसायटी, दत्तमंदिराजवळ, वाकड), सुरेश बापू विनोदे (वय 51, रा. शेडगे वस्तीजवळ, वाकड) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी स्वाती प्रशांत भट (वय 39, रा. बिल्डिंग ई, ड्यु-डेल सोसायटी) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी हा डयु-डेल सोसायटीच्या सेक्रेटरी असून आरोपी सुदेश राजे चेअरमन आहे. तर आरोपी कलाटे व विनोदे हे बालाजी असोसिएटचे मालक आहेत. सोसायटीने सहा ते दहा पर्यंतच्या गाळ्यांचे बांधकाम करण्याचे काम बालाजी असोसिएटसला दिले. त्यातील तीन गाळे सोसायटीला तर दोन गाळे बालाजी असोसिएटसला मिळणार होते. तसेच एक कोटी 25 लाख रुपयेही सोसायटीला मिळणार होते. दरम्यान, सुदेश राजे याने कलाटे व विनोदे यांना सोसायटीचे खोटे पत्र देत या खोट्या पत्राद्वारे बालाजी असोसिएटसकडून वैयक्तिक खात्यावर पैसे घेतले. यासह सोसायटीच्या मालकीचे तीन गाळे सोसायटीला विश्‍वासात न घेता परस्पर बालाजी असोसिएटसला विकून सोसायटीची फसवणूक केली. या कामासाठी कलाटे व विनोदे यांनी मदत केली. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Nepal Dispute: भारत-नेपाळ संबंधांमध्ये मोठी हालचाल! बालेन शहा सरकार भारतासमोर ४ अटी ठेवणार; आणखी एक मोठा राजनैतिक डाव

नाना पाटेकरांनी खरंच कानाखाली मारली मग मी पण दिली एक ठेवून... अभिनेत्रीने सांगितला 'यशवंत' सिनेमाचा किस्सा

Mumbai Crime: पाच महिन्यांनी हत्येचा उलगडा, नाल्याच्या चेंबरमध्ये आढळला कुख्यात गँगस्टरचा सांगाडा

Police Recruitment : आंबेगाव तालुक्याच्या दुष्काळग्रस्त वडगावपीर गावातील निकिता आदक हिची जिद्द मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मुंबई पोलीस दलात निवड

India T20I Squad: सूर्या ते हार्दिक... T20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघातील ४ मॅच विनर्सलाच मिळाला डच्चू! एका फिनिशरचाही समावेश

SCROLL FOR NEXT