Crime News esakal
पुणे

Pune Crime : येरवड्यातील लाच प्रकरणात तीन पोलिस हवालदार निलंबित

पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी १३ हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यातील तीन पोलिस हवालदारांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी १३ हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यातील तीन पोलिस हवालदारांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. पोलिस दलाची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी या तिघांवर परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी ही कारवाई केली.

पोलिस हवालदार राजेंद्र रामकृष्ण दीक्षित, पोलिस हवालदार जयराम नारायण सावळकर आणि पोलिस हवालदार विनायक उल्गा मुधोळकर अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत. त्यांनी मोटार अपघाताची तक्रार दाखल करून घेण्यासाठी एका ट्रॅव्हल्स व्यावसायिकाकडे १३ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने येरवडा पोलिस ठाण्यात सोमवारी मध्यरात्री सापळा रचून एका पोलिस हवालदारास लाच घेताना अटक केली. त्यांना मदत करणाऱ्या अन्य दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह तिघांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या तिघांवर बेजबाबदार वर्तन केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

१६ जूनपर्यंत पोलिस कोठडी

राजेंद्र दीक्षित यांना बुधवारी (ता. १४) शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने हवालदार दीक्षित यांना १६ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

शोधासाठी दोन पथके रवाना

या गुन्ह्यातील जयराम सावळकर आणि विनायक मुधोळकर या दोघांचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून शोध घेण्यात येत आहे. त्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आल्याची माहिती ‘एसीबी’चे तपास अधिकारी पोलिस निरीक्षक भारत साळुंखे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT