पुणे

पुणे : टिळक रस्त्यावर मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा

सकाळ वृत्तसेवा

पुण्यातील टिळक रस्त्यावरील हिराबाग चौक परिसरात मंगळवारी रात्री एका मद्यधुंद तरुणीने धिंगाणा घातला. दारुच्या नशेत तरुणीने रस्त्यावरील वाहतूक अडवण्याचा प्रयत्न केला. ही तरुणी चक्क रस्त्यावर लोळत होती. तिचा हा ड्रामा बराच वेळ सुरु राहिला. येथील काही नागरिकांनी याप्रकरणाची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येत तरुणीची समजूत काढल्याचं समजतं. मात्र, या घटनेचा व्हिडिओ पुण्यात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हिराबाग चौक परिसरात मद्यधुंद अवस्थेतील तरुणी टिळक रस्त्यावर उभं राहून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न करत होती. यानंतर ती रस्त्यावर झोपलीही. माझ्या अंगावरून गाडी न्या, असं तरुणी यावेळी ओरडत होती. काहींनी तिला रस्त्यावरून बाजूला जाण्यासाठी विनंती केली, पण ती कुणाचेही ऐकण्याच्या स्थितीत नव्हती.

तरुणीच्या या झिंगाट कृतीने रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली होती. यामधील काही लोकांनी याची पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी तिची समजूत काढत रस्त्याच्या बाजूला काढलं अन् पोलिस स्थानकात घेऊन गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT