KMT26B00977
कोरोली ः गतवर्षीच्या महापुरात तिऱ्हे-शिंगोली मार्गावरील पुलाच्या रस्त्याला पडलेला खड्डा अद्यापही तसाच आहे.
महापुराला वर्ष उलटलं तरी पुलाचा खड्डा मात्र तसाच!
वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न; पालखी मार्गावरील रस्ता दुरुस्तीची मागणी
कोरोली, ता. ९ : मागील वर्षी सीना नदीला आलेल्या महापुरात सोलापूर–मंगळवेढा महामार्गावरील तिऱ्हे–शिंगोली–तरटगाव मार्गावरील जुन्या पुलाचे मोठे नुकसान झाले. मात्र, महापुराला वर्ष उलटूनही पुलाची दुरुस्ती न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
येत्या २० जुलै रोजी श्री गजानन महाराज, शेगाव यांच्या पालखीचा मुक्काम तिऱ्हे येथे असून दुसऱ्या दिवशी पालखी शिंगोली–तरटगावमार्गे पुढे जाणार आहे. या मार्गावरून हजारो वारकरी पायी प्रवास करतात. पुलावरील मोठे खड्डे आणि धोकादायक स्थितीमुळे भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
सोमनाथ दावणे म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वारंवार निवेदने देऊनही दखल घेतली जात नाही. निदान वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून तरी पुलाची तातडीने दुरुस्ती करावी. कोणतीही दुर्घटना होण्यापूर्वी हा प्रश्न मार्गी लावणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.