पुणे

साकव पुलाखाली साठवण बंधरा बांधा

CD

महाळुंगे पडवळ, ता. ३ : चास-साकोरे (ता. आंबेगाव) रस्त्यावर शेंद्रे ओढ्यावर साकव पूल उभारून त्याखाली साठवण बंधारा करावा, अशी मागणी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या तुलसी सचिन भोर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
श्री क्षेत्र भीमाशंकर कडे ये-जा करण्यासाठी पर्यटक कळंब, चास, घोडेगाव या रस्त्याचा उपयोग करतात. तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांनी मुखातून वेद वदविलेल्या रेड्याचा दशक्रिया विधी चास येथे झाला. त्याचे ग्रामस्थांनी मंदिर उभारले आहे. त्यामुळे या ठिकाणाला पर्यटक भेट देतात. शेंद्रे ओढ्यावर जुन्या पद्धतीचा पूल व दोन्ही बाजूने तीव्र उतार असल्याने अनेकदा येथे अपघात होत आहेत. तसेच ऊस वाहतूक करताना पूल ओलांडून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेकदा बैलाचे पाय मोडून अपघात झाले आहेत. त्यामुळे येथे साकव पूल होणे गरजेचे आहे, असे भोर यांनी सांगितले.
दरम्यान, चास येथे नुकतीच पुलाची पाहणी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता सम्राट भिसे, तुलसी भोर यांनी केली. यावेळी शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सचिन भोर व ग्रामस्थ उपस्थित होते.
----------------------------------------------------------------------------------------------------
00611

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT